सोलापूर : प्रतिनिधी
मोहोळ पोलीस स्टेशन व महिला आर्थिक विकास, महामंडळ, सोलापूरयांच्या संयुक्त विध्यमाने विषमुक्त शेती कार्यशाळा आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करून विषमुक्त अन्न निर्मिती करावी व शेतीच्या उत्पादन खर्च कमी करावा आणि महिलांना त्यांच्या संरक्षणसाठी कायद्यातील तरतुदी बाबत मार्गदर्शन केले.
तसेच गावात दारू बंदी करणे, रस्ता, बांध यासाठी होणारी भांडणे व गावातील तंटे रोखण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जातील. असे आश्वासन दिले. त्याच बरोबर शेतकऱ्यांनी विष मुक्त शेती करावी व स्वत: बरोबरच इतरांनी देखील आहारात विष मुक्त अन्नाचा वापर करावा असे गोरक्षनाथ भांगे म्हणाले. सोमनाथ लामगुंडे, DCO MAVIM यांनी कर्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना बचत गट, आर्थिक पुरवठा, विविध शासकीय यीजणांची सांगड, नियमित आरोग्य तपासणी, पोषणपरस बाग, स्वच्छता, व्यवसाय आणि आर्थिक साक्षरताचे महत्व पटवून देत नवतेजस्विनी प्रकल्प अंमलबजावणी बाबत मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेस बचत गट सदस्य, गटातील पदाधिकारी, CMRC कार्यकारणी, CRP, ग्रामसंघ लेखापाल,क्षेत्र समन्वयक,CMRC LDC, CMRC लेखापाल, व्यवस्थापक व मोहोळ तालुक्यातील पोलीस पाटील, शेतकरी आणि तालुका अभियान कक्ष, मोहोळ स्टाफ उपस्थित होते.
या कार्यशाळेस विशेष सहकार्य गोपाळ साखरे, पोलीस हवालदार, प्रशांत गायकवाड, तालुका सानियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, योगेश बोडके, तालुका उपजीविका सल्लागार यांचे लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश सिरसट यांनी केले.
यावेळी या कार्यशाळेस प्रमुख उपस्थिती अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण संकेत देवळेकर, DYSP, सोमनाथ लामगुंडे, जिल्हा समन्वयक अधिकारी, गोरक्षनाथ भांगे, जिल्हा उपजीविका व्यवस्थापक धाराशिव, हेमंत शेंडगे, पोलीस निरीक्षक, मोहोळ पोलीस स्टेशन, प्रकाश पवार, CEO पवार ऍग्रो इंनोवेटिव्ह सोल्युशन्स प्रा. ली. जळगाव विद्यासागर कोळी, कृषी शस्त्रज्ञ, मुरुडयांच्या प्रमुख उपस्थित ही कार्यशाळा पार पडली.