सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

रे नगर कॉ.गोदुताई नगर येथे पायाभूत सुविधा विकास कामाला गती द्या, आडम मास्तरांचे पालकमंत्री गोरे यांना निवेदन

सोलापूर : प्रतिनिधी

नुकतेच पार पडलेल्या मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा.ना.जयकुमार गोरे यांची निवड झाली. त्या अनुषंगाने सोलापूर शहरातील नागरिकांना शासनाकडून नागरी मुलभूत सुविधा व शासनाच्या योजनेचा लाभ तसेच श्रमिक कष्टकऱ्याच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावे याकरिता शासकीय विश्राम गृह येथे प्रत्यक्ष भेट घेऊन यथोचित स्वागत करून नागरिकांच्या विविध मागण्यांचे निवेदन माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी दिले.

रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर)यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे विविध मागण्यांचे व प्रामुख्याने कॉ गोदूताई परुळेकर नगर येथील पायाभूत सुविधा, रे नगर , आणि मयत साक्षी कलबुर्गी हिच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून 25 लाख आर्थिक मदत मिळाली याचे निवेदन देण्यात आले. यावेळी पक्षाचे राज्य समिती सदस्य कॉ युसुफ मेजर, माजी नगरसेविका सुनंदा बल्ला, अभियंता मेहुल मुळे, DYFI चे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी, ॲड.अनिल वासम, कॉ विल्यम ससाणे, कॉ वसीम मुल्ला आदींची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री यांना खालील मागण्यांचे सविस्तर विवेचन केले. १९ जानेवारी २०२४ रोजी दस्तुरखुद्द पंतप्रधान यांच्या हस्ते ३० हजार असंघटीत कामगारांच्या रे नगर घरांचे हस्तांतरण झाले. यामध्ये पहिल्या टप्प्यातील १५ हजार २४ घरे वितरीत करण्यात आली. त्या पैकी ३००० लाभार्थ्यांनी घरांचा ताबा घेतला. डिसेंबर अखेरीस उर्वरित १५ हजार घरांचे हस्तांतरण करण्यात येणार आहे. परंतु रे नगरला जाण्यासाठी दळणवळणची व्यवस्था नाही. त्यामुळे लाभार्थी प्रत्यक्ष जाऊन राहण्यासाठी तयार नाहीत. तसेच शाळा, महाविद्यालये, दवाखाना, रास्तभाव धान्य दुकान, क्रीडांगण, स्मशानभूमी, भाजी मंडई, विडी कारखाने आदि लाभार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या अत्यावश्यक सुविधांचा आभाव आहे. सोलापूर शहर ते रे नगरला जाणाऱ्या रस्त्यांसाठी शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे निधी पाठवून दिलेला आहे. परंतु अद्याप ते काम मार्गी लागलेले नाही. तसेच अकृषिक सारा यातून सवलत सुध्दा मिळालेली नाही. या सुविधा तातडीने उपलब्ध व्हावे.

१ सप्टेंबर २००६ साली कॉ. गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या १० हजार विडी कामगारांना घरांचे हस्तांतरण करण्यात आले. त्यावेळी वसाहत अंतर्गत रस्ते व तात्पुरत्या स्वरूपाचे शोषखड्डे निर्माण केले. परंतु अंतर्गत रस्ते आणि शोषखड्डे पूर्णतः म मृतप्राय झालेले असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. रोगराईचा प्रादुर्भाव वाढून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. म्हणून तातडीने ड्रेनेज व शहराला जोडणारे अंतर्गत नवीन रस्ते करणे अत्यंत आवश्यक आहे.

सोलापूर शहरांतर्गत अनियंत्रित व बेजबाबदार जड व माल वाहतूकीमुळे दगावलेली ६ वर्षाची साक्षी कलबुर्गी हिच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून २५ लाख रुपये आर्थिक मदत मिळवून द्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!