सामाजिकक्राईममहाराष्ट्रसोलापूर

“पालिका आयुक्त साहेब जरा इकडे लक्ष द्या”, उमा नगरीतील आरक्षित जागेवरील बेकादेशीर पत्राशेड अतिक्रमण हटवा, अन्यथा..

सोलापूर : प्रतिनिधी

टी.पी ४ फायनल प्लॉट नंबर १०५, उमानगरी नंबर १३, मुरारजी पेठ, सोलापूर येथील प्लॉट नंबर २०५ या, टीपी आरक्षित जागेवरील बेकायदेशीर पत्राशेडचे बांधकामचे अतिक्रमण काढणेबाबतचा तक्रारी अर्ज श्रीमती सुमती संजय जोजारे यांनी पालिका आयुक्तांना दिला आहे.

सुमती जोजारे आपल्या तक्रारी अर्जात म्हणतात, मी तक्रारदार, स्वतः उमानागरी सहकारी संस्था नंबर १३ या संस्थेची सभासद आहे. त्यामुळे सदरच्या आरक्षित जागेबाबत तक्रार करण्याची कायदेशीर लोकस स्टैंडी Locus Standy मला होती व आहे. उमानगरी सहकारी संस्था नंबर १३ फायनल प्लॉट नंबर १०५ मधील प्लॉट नंबर २०५ हा मंजूर विकास योजनेनुसार आरक्षण क्रमांक ०१/४५ अन्वये व दिनांक १४/०६/१९९९ च्या अंतिम मंजूर रेखांकनानुसार रिक्षा स्टॉप व पार्किंगसाठी आरक्षित केलेला आहे.

त्यामुळे त्या आरक्षित जागेवर काही सभासद गाड्या पार्क करीत होते तर काही रिक्षाही तिथे थांबत होत्या. परंतु, चेयरमन अजित गांधीने तिथे पार्किंग केलेल्या गाड्या व रिक्षा फोडण्याची धमकी दिली. व ती जागा विक्री केली. पार्किंग व रिक्षा स्टॉपसाठी आरक्षित जागा असतानाही संस्थेचे चेयरमन अजित गांधी यांचेशी संगनमत व आर्थिक देवाण-घेवाण करून प्लॉट धारक व्यक्तीने अनाधिकारने व बेकायदेशीरपणे उमा नगरी नंबर १३ येथील प्लॉट नंबर २०५ या आरक्षित असलेल्या त्या जागेवर बेकायदेशीरपणे पत्राशेडचे बांधकाम करून तिथे काच कारखाना चालू केलेला आहे. त्या काच कारखान्यातून उडणाऱ्या काच मिश्रित हवेमुळे आजूबाजूच्या रहिवाशी व नागरिकांच्या जीवित्तास धोका निर्माण झालेला आहे.

सदरील आरक्षित जागेवर अनधिकाराने व बेकायदेशीरपणे टाकलेल्या पत्राशेडचे व काच कारखान्याचे अतिक्रमण महापालिकेने काढून टाकून सदरची आरक्षित जागा सभासदांच्या पार्किंगसाठी व रिक्षा स्टॉपसाठी खुली करून द्यावी, प्रशासनाने कारवाई करण्यास विलंब केल्यास किंवा सदरचे अतिक्रमण न काढल्यास महापालिका प्रशासना विरूध्द मला उपोषण करावे लागेल. याची आपण नोंद घ्यावी असा इशारा ही सुमती जोजारे यांनी आपल्या तक्रारी अर्ज दिला आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई होणार की नाही याकडे शहरवासी यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!