अखेर विको प्रोसेसच्या जमीन विक्रीत २८ कोटीच्या गैरव्यवहारातील आरोपीला जामीन मंजूर

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन (विव्हको प्रोसेस) च्या जमीन विक्रीत २४ कोटी ३३ लाख ८६ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका विशेष लेखापरीक्षक बी. सी. पवार यांनी ठेवला. त्याला जबाबदार धरून संस्थेच्या १४ संचालकांच्या विरोधात मंगळवारी रात्री जेलरोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अविनाश प्रकाश बोमड्याल (रा. रविवार पेठ, सोलापूर) यांच्यासह सहदेव हणमंतु इप्पलपल्ली, श्रीहरी रामण्णा विडप, संजय भूमय्या कोंडा, मनोहर पापय्या इगे, यादगिरी बालय्या वड्डेपल्ली, सर्वेशम शंकरराव येमुल, श्रीहरी हणमय्या इराबत्ती, लक्ष्मीनारायण शंकर देवसानी, वेणुगोपाल केशव अंकम, कल्पना श्रीधर रापोल, मंगम्माबाई कृष्णहरी आडम, रामचंद्र बालराज सामलेटी या संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाले होता.
संस्थेचे अध्यक्ष अविनाश बोमड्याल व इतर संचालकांनी में जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनाचा अर्ज दाखल केला, सदर अटकपूर्व जामीनाचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला होता. त्यानंतर सदर आरोपी हे मा उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनाचा अर्ज दाखल केला सदरचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज देखील मा. उच्च न्यायालयाने फेटाळून लावून अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला होता.
त्यानंतर आरोपी हे स्वतःहून अटक झाले पोलिसांनी आरोपींना में प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले व तदनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात जामिनाचा अर्ज दाखल केला ते जामीन अर्ज मे कोर्टाने नामंजूर केला होता त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात जामनाचा अर्ज दाखल केला तेही जमिनीचा अर्ज में जिल्हा न्यायालयाने नामंजूर केला होता. त्यानंतर में उच्च न्यायालय मुंबई येथे पुनश्च जामीनाचा अर्ज दाखल करण्यात आला व सदरचा जामीनाचा अर्ज देखील में उच्च न्यायालयाने फेटाळून नामंजूर करण्यात आला आहे.
त्यानंतर अखेर संचालक मनोहर पपय्या इगे यांच्यावतीने ॲडव्होकेट मनोज नागेश पामुल यांनी में प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात पुनश्च जामीनाचा अर्ज दाखल केला. आरोपी मनोहर पपय्या इगे हे केवळ संचालक असून सदर गैर व्यवहारात त्यांचा कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप नव्हता याउलट त्यांनी त्यांनी सदर गैरव्यवराबाबत संस्थेस पत्र देऊन कळविले होते. आणि २४ फेब्रुवारी २०२५रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ अन्वये केलेल्या चौकशीअंती जी. पी. कदम से. नि. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा प्राधिकृत अधिकारी क-८८ सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन नियमित, सोलापूर यांनी मनोहर पापय्या इगे यांना दोषमुक्त करण्यात आले. त्यामुळे मनोहर पापय्या इगे यांचा जामिनाचा अर्ज मंजूर करण्यात यावे म्हणून युक्तिवाद केला ॲडव्होकेट मनोज नागेश पामुल यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती मर्ढेकर यांनी दि. १२ मार्च २०२५ रोजी मनोहर पापय्या इगे यांचा जामिनाचा अर्ज मंजूर केला.
आरोपी मनोहर पापय्या इगे यांच्यावतीने ॲड. मनोज पामूल व त्यांचे सहकारी ॲड. राकेश कोम्पेल्ली, ॲड.बालराज कैरमकोंडा, ॲड.स्वप्नील पुंजाल, ॲड.ज्योती अल्ली, ॲड.श्रीनिवास बंडी, ॲड. तुषार पामूल व सरकार तर्फे सरकारी वकील श्रीमती लिंबाळे यांनी कामकाज पाहिले.