सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
अनिता गवळी यांना हैदराबाद येथे “भारत भूषण पुरस्कार 2025” ने केले सन्मानित

सोलापूर : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या अनिता गवळी या सोलापूरच्या थोर सामाजिक कार्यकर्त्या असून तेलंगणाची राजधानी हैद्राबाद शहर येथे सुप्रसिद्ध BM बिर्ला ऍडटोरियम सेंटर येथे जागतिक महिला दिवसाचे औत्सुक्य साधून त्यांना CSM 9 चॅनल द्वारा प्रमुख सत्यनारायण जाधव यांच्या संकल्पनेतून मान्यवरांच्या हस्ते त्यांना नारी सन्मान म्हणून “भारत भूषण पुरस्कार” 2025 हा त्यांना देण्यात आला.
त्यांनी केलेल्या सामाजिक, महिला सक्षमीकरण, साहीत्य क्षेत्र, शासन दरबारी महिलांच्या समस्या इत्यादी माध्यमातून सौ अनिता गवळी यांना सर्वश्रेष्ठ महिला पुरस्कार देऊन सन्मान देऊन गौरविण्यात आहे. त्या बद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.