पोलीस आयुक्तालयाच्या धिंमतीला विविध अकरा प्रकारच्या वाहने शहर पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात दाखल

सोलापूर : प्रतिनिधी
2024 – 25 चा जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहन ताफ्यात आता नव्याने अकरा वाहने समाविष्ट करण्यात आली असून गुरुवारी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त दिपाली काळे, विजय कबाडे, आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहर पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात समाविष्ट झालेल्या वाहनाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नव्यानेच समाविष्ट झालेल्या वाहनाचा नक्कीच फायदा होईल असं म्हणत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी प्रलंबित असलेला पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्ग काढावा अशी विनंती यावेळी केली.
आवश्यकतेनुसार पोलीस ठाण्याकरिता नव्याने इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी दिली.