सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांची दमदार कामगिरी

सोलापूर : प्रतिनिधी
मंद्रुप पोलीस ठाणे गु र नं ३४१/२०२४ बी एन एस ३१८ (४) ३१६ (२) माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००९ चे कलम ६६ (क) अन्वये दिनांक १५/१०/२०२४ रोजी दाखल गुन्हयातील तक्रारदार हे व्यवसायिक असुन त्यांना मोतीलाल ओखाल इन्वेस्ट क्लब या बनावट व्हॉटसअप ग्रुपच्या अॅडमिन यांनी संपर्क साधुन त्यांचा विश्वास संपादन केला व दि ०८/०९/२०२४ ते दि २१/०९/२०२४ या कालावधीत तक्रारदार यांची सुमारे ४२ लाख १० हजार रुपयांची फसवणुक केली होती.
सदर गुन्हयामध्ये अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली विकास दिंडुरे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस ठाणे, रोहिदास पवार, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे यांच्या पर्यवेक्षणाखाली सायबर पोलीस ठाणेकडील पथकातील पोलीस अंमलदार म. पो.ह. ज्योती फुलारी, पो.ह. अभिजीत पेठे, पो.ह. जुबेर तांबोळी, पो.ह. युसुफ पठाण, पो.ह. व्यंकटेश मोरे, म.पो.ना. अंबरकर, पो.शि.स्पनिल सन्नके, पो.शि.अजित सुरवसे, पो.शि. रतन जाधव, पो.शि. आशुतोष कुलकर्णी, पो.शि. जहीरान नाईकवाडी यांनी सुसंगत व तांत्रिक तपास करुन, आरोपीच्या मोबाईल क्रमांकाची, व्हॉटसअप ग्रुपची, बँक खात्यांची माहिती मिळवुन तक्रारदार यांचे तब्बल ४१ लाख १० हजार रुपये इतकी रक्कम तक्रारदार यांना मिळवुन दिली आहे.
सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण कडुन करण्यात आलेल्या या दमदार कामगीरसाठी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी वर नमुद अधिकारी व अंमलदार यांना त्यांचे कामगिरी बाबत उत्तेजनार्थ बक्षिस देवुन गौरव केला असुन सोलापूर ग्रामीण जिल्हयातील सर्व नागरीकांना आवाहन केले की, ऑनलाईन फसवणुकी संदर्भात आपल्या कोणत्याही तक्रारी असल्यास आपण तत्काळ १९३० या टोल फ्री क्रमांकावर किंवा सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे संपर्क साधुन त्यांच्या तक्रारी नोंदवाव्यात.