संगम ग्रह लघु उद्योगाच्या वैष्णवी सुरवसे यांचा सन्मान

सोलापूर : प्रतिनिधी
संग्राम गृह उद्योग समूहाच्या सदस्य वैष्णवी नितीन सुरवसे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना उद्योग क्षेत्रातील आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्योतिर्लिंग बहुउद्देशीय समाजसेवी संस्था गादेगाव व ज्योती मर्य योग निसर्गोपचार केंद्र पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने पंढरपूर येथे आयोजित एका समारंभात सुरवसे यांचा गौरव करण्यात आला.
योग गुरु डॉ ज्योती शेटे, त्यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम पार पडला, यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजश्री देडे, अनिता नागराळे, एडवोकेट सुकेशनी शिर्के बागल, उद्योजक राजेश वाघमोडे, डॉ माणिक मस्के, मिलिंद वायकर, सुषमा रामचंद्र सुरवसे, डॉ.समृद्धी शिंदे, प्रा भगवती सुरवसे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरवसे हिला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संगम ग्रह लघु उद्योगाचे संस्थापिका बबीता धनंजय सुरवसे, प्रा सुनील मगर, कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले यांनी तिचे अभिनंदन केले आहे, या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.