खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सोलापूरात पद्मशाली तेलंगणा भवन साठी एक कोटी केले मंजूर
तेलंगणातील पद्मशाली समाजाच्या पदाधिकारी मार्फत शासकीय आदेश (जी. आर.) पद्मशाली ज्ञाती संस्थेकडे सुपूर्त करणार

सोलापूर : प्रतिनिधी
नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे सोलापूरला प्रचारासाठी आले असताना खासदार प्रणिती शिंदे आणि पद्मशाली ज्ञाती संस्थेने सोलापुरात तेलुगु भाषिकांची संख्या मोठ्ठी असून पद्मशाली तेलगु भवन साठी एक कोटी रुपये निधी देण्याची मागणी केली होती. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत तेलंगणा सरकारकडून सोलापुरात पद्मशाली तेलंगणा भवन बांधण्यासाठी एक कोटी रुपये देणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्या निधीतून पद्मशाली तेलंगणा भवन उभारावे असे त्यांनी म्हटले होते.
तसेच दिनांक, ०९ मार्च २०२५ रोजी हैदराबाद येथे झालेल्या अखिल भारत पद्मशाली संघम चे १७ वे अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि देशभरातून आलेले पद्मशाली समाजाचे नेते मंडळी यांची प्रमुख उपस्थित होते. याही वेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पद्मशाली तेलंगणा भवन साठी दिलेल्या आश्वासनाची स्वतः आठवण करून दिली होती.
याचा पाठपुरावा करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्यासमवेत शिष्ठमंडळाने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी साहेब यांची हैदराबाद येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी रेवंत रेड्डी साहेबांनी शिष्टमंडळाचे स्वागत करून सोलापूरात पद्मशाली तेलंगणा भवन साठी एक कोटी रुपये ताबडतोड मंजूर केले. आणि त्याचा शासकीय आदेश (जी. आर.) लगेच काढ़तो असे सांगितले आणि तो शासकीय आदेश (जी. आर.) तेलंगाना पद्मशाली समाजाचे पदाधिकारी यांच्यामार्फत सोलापुरातील पद्मशाली ज्ञाती संस्थेकड़े सुपूर्त करणार आहेत.
यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे जनार्दन कारामपुरी, विश्वस्त नरसप्पा ईप्पाकायल, रामचंद्र जन्नू, सत्यनारायण गड्डम, महांकाली येलदी, संतोष सोमा, उमेश मामड्याल, तिरुपती परकीपंडला, अंबादास बिंगी, रमेश कैरमकोंडा आदी पदाधिकारी उपस्थित होते.