मुस्लिम युवकाने खासदार प्रणिती शिंदेना धरले धारेवर, शहर मध्य मधून मुस्लिम समाजाला उमेदवारी न देण्यावरून विचारला प्रश्न

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी मधील अकरा मुस्लिम नेत्यांनी एकत्र येत शहर मध्य मधून मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती परंतु खासदार पण निधी शिंदे यांनी माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांचे नाव पुढे केले बाबा मिस्त्री हे शहर दक्षिणमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते आणि ते सध्या अपक्ष म्हणून दक्षिणमधून निवडणूक लढवत आहेत.
काँग्रेस, महाविकास आघाडी करून शहर मध्य मधून काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी मिळाली त्यांचा प्रचार खासदार प्रणिती शिंदे हे करत आहेत. दरम्यान एका मुस्लिम युवकाने खासदार प्रणिती शिंदे यांची गाडी अडवत त्यांना प्रश्न विचारला.? की शहर मध्य मधून मुस्लिम समाजाला उमेदवारी का दिली नाही.? यावर खासदार प्रणिती शिंदे यांनी उत्तर दिले परंतु त्या युवकांनी देखील प्रतिप्रश्न करत प्रणिती शिंदे यांना धारेवर धरल्याच पहावयास मिळालं पहा हा व्हिडिओ…