यंदा दक्षिण मध्ये परिवर्तन होणार, मतदारांनी ठरवलंय सर्वसामान्यांच्या मुलाला निवडून देणार : युवराज राठोड

सोलापूर : प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांचा रॅलीच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील शहरी भागामध्ये झंजावात सुरू आहे. सैफुल परिसरातील सर्व कॉलनी, अपार्टमेंट, यासह बंगलोज या भागात भव्य रॅली काढत हजारो महिलांसह त्यांनी शक्ती प्रदर्शन करत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
यंदा दक्षिण मध्ये परिवर्तन होणार असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मतदारांनी दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीला झुकते माप दिले असून प्रस्थापित विरोधात सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला निवडून देणार असल्याची केल्याची माहिती उमेदवार युवराज राठोड यांनी दिली.
युवराज राठोड यांच्या भव्य रॅलीमध्ये युवक महिला आणि पुरुष यांची सारख्या मोठ्या संख्येने होती यावेळी त्यांनी सैफुल भागातील वैष्णवी नगर, ओम गर्जना चौक, अष्टविनायक नगर, दावत चौक, नेहरूनगर, मंत्रीचंडक नगर आदींसह विविध भागात त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत रॅली काढली.