प्रभाग २२ येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे शुभारंभ, मूलभूत सुविधायुक्त प्रभागाचा चौफेर विकास : किसन जाधव

सोलापूर : प्रतिनिधी
प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सोलापूर महानगरपालिका तसेच राज्यस्तरीय विविध शासकीय योजना अंतर्गत सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभाग क्रमांक २२ चा चौफेर विकास साधला असल्याचे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी व्यक्त केलं. दरम्यान प्रभाग क्रमांक २२ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत सन २०२३-२४ या हेड अंतर्गत मंजुनाथ नगर डायमंड बेकरी ते गायकवाड घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, हरिदास गायकवाड, श्रीमती जानकी बाई बापु जाधव, मागगुबाई विठ्ठल जाधव, अश्र्विनी अवि गायकवाड, छाया गायकवाड, ह.भ.प.श्रीमती शिंदे, बनसोडे मावशी, जॉन वेरूलीक, अजय अश्टुळ, मायकल जेवल, जॉन झंकेर, दिलीप अडसुळे, वासू हल्ली, दीपक डोईफोडे, कुणाल बाप्पू जाधव, राहुल नवगिरे, अविनाश जाधव, गौस शेख, सुरज चव्हाण, बाळकृष्ण जाधव, राजू बाप्पा जाधव, प्रशांत धोत्रे, शोभाताई गायकवाड, अश्विनी नवगिरे, शिवानी नवगिरे, सावित्री गायकवाड, मेघा गायकवाड, लक्ष्मी कांबळे, लक्ष्मी गायकवाड, उषा गलांडे, सुवर्णा शेंडे, संगीता साबळे, नंदा चव्हाण, विजय गुरव, यांच्यासह प्रभागातील नागरिकांचे उपस्थिती होती.
प्रभाग क्रमांक २२ चा वाढता विस्तार पाहता येतील स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार प्रभागात विकासकामे केली. स्थानिक रहिवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महापालिका आणि राज्य सरकारकडून निधी खेचून आणून प्रभागाचा चौफेर विकास साधला. या पुढील काळात नागरिकांना अत्याधुनिक सोयी सुविधा पुरवण्याचा मानस असल्याचेही यावेळी जाधव म्हणाले.
या भागात नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे याचे प्रभाग क्रमांक 22 च्या सर्वांगीण विकासासाठी विशेष सहकार्य लाभलं असल्याचेही यावेळी किसन जाधव यांनी सांगितले. दरम्यान नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव यांच्या माध्यमातून या भागात विकासाचे कामे पूर्ण होत असल्याने येथील स्थानिक नागरिकांनी नगरसेवक गायकवाड आणि जाधव यांचे आभार मानले.