
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरातील कुमठा नाका परिसरातील श्री नवलबाई फुलचंद शहा कोठारी प्रशालेची सहल जयपूर राजस्थान, लाल किल्ला आग्रा ताजमहाल, वृंदावन, मथुरा तसेच आमेर किल्ला, अजमेर शरीफ,पुष्कर ब्रह्मदेव मंदिर आधी स्थळांना भेटीतून मुलांना शैक्षणिक व ऐतिहासिक प्रेक्षणीय सहल घडवून आणले.
विद्यार्थ्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच सामाजिक, शैक्षणिक, माहिती मिळावी. पर राज्यातील लोकसंस्कृती वारसा तसेच विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यास वृत्तीला चालना देऊन ऐतिहासिक व भौगोलिक गोष्टीचे ज्ञान व्हावे या उद्देशाने मुख्याध्यापक यांनी शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने सर्व शिक्षकांनी पाचवी ते दहावी पर्यंतच्या विविध कामगारांच्या मुलांसाठी सहल घडून आणल्याबद्दल पालकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
मुख्याध्यापक रमेश यादवाड यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील सर्व शिक्षक नियोजन करून सहल विभाग प्रमुख माधुरी बिज्जर्गी -जमादार, अमृता माने, स्मिता काळे, रितेश मेहता, सिद्धाराम बिडवे, संपदा शिंदे या शिक्षकांनी पुढाकार घेऊन सहल यशस्वी केले. सहल यशस्वी केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत कोठारी, सचिव अजित नाथ उपाध्ये, विश्वस्त देवेंद्र शटगार यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.