51 रक्तदात्यांनी रक्तदान करून बाबासाहेबांना दिली मानवंदना, भीमशक्ती तरुण मंडळाचा समाज उपयोगी उपक्रम

सोलापूर : प्रतिनिधी
भिमशक्ती तरुण मंडळ, विष्णू मिल चाळ, डोणगाव रोड सोलापूर यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. हे रक्तदान शिबिर विष्णू मिल चाळ, आंबेडकर कट्टा या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आले. याच बरोबर महिलांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी आपले योगदान दिले.
यावेळी प्रमुख उपस्थिती माजी उपमहापौर तथा शिवसेनेचे समन्वयक दिलीपभाऊ कोल्हे, पत्रकार महेश कुलकर्णी, विठ्ठल महाराज बडगंची, आदींसह मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल उडानशिव, अमित जेटीथोर, किरण भडकुंबे, आकाश पंचलोर, आतिश चव्हाण, रनजीत कोल्हे, लोकेश माने, मंगेश डोंगरे, पार्थ कोल्हे, अनुराग लामतुरे, तुकाराम शिंदे, सचिन भडकुंबे, रितेश जेटीथोर यांच्यासह युवकांनी परिश्रम घेतले.