बाबासाहेबांच्या जयंतीदिनी भीम अनुयायांना पाणी बॉटलचे वाटप, प्रशांत गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम

सोलापूर : प्रतिनिधी
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रशांत गायकवाड मित्र परिवाराच्यावतीने यंदाच्या वर्षीही खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते हजारो भीम अनुयायांना पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अनेक मंडळं वेगवेगळे उपक्रम राबऊन साजरी करतात.
प्रशांत गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षाची उन्हाची तीव्रता आणि शहरातील पाणी टंचाई विचारात घेऊन पाणपोईचा उपक्रम राबविला जातो.
गेल्या 18 वर्षापासून अखंडपणे पाणपोईची सोय करून भीम अनुयायांची सेवा करण्यात येते. यंदा प्रथमच अनुयायांसाठी ‘पाणी बॉटल’ हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, शिक्षण अधिकारी कादर शेख, समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, युवासेना प्रमुख सागर शितोळे, सुमित वाघमोडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले. दरम्यान प्रमुख पाहुण्यांचा संयोजक संयोजक प्रशांत गायकवाड यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी अरुण क्षीरसागर, सचिन घोडके, गिरीश जाधव, उमाकांत राजगुरू, संजय कांबळे, पद्मसिंह शिंदे उपस्थित होते.