सोलापूरमहाराष्ट्रराजकीयशिक्षणसामाजिक

ठरलं.. सौ.नागिनीताई प्रविण इरकशेट्टी ‘या’ महापालिका निवडणूक लढणारच..

सोलापूर : प्रतिनिधी

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सौ नागिणीताई प्रविण इरकशेट्टी या जुळे सोलापूर भागातून महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राजकारणासाठी नाही तर समाज सेवेसाठी सौ नागिणीताई प्रविण इरकशेट्टी ह्या महापालिका लढणार असल्याचे सूतोवाच करीत राजकीय माहोल तापवण्यास आरंभ केला आहे. जुळे सोलापूर मतदार संघात आपली प्रतिमा उज्ज्वल भविष्यासाठी कशी भक्कम होईल, यादृष्टीने प्रयत्न करताना सौ नागिणीताई प्रविण इरकशेट्टी दिसून येत आहेत.

सौ.नागिनीताई प्रविण इरकशेट्टी यांनी महापालिका निवडणूकीसाठी आत्तापासूनच तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सौ.नागिनीताई इरकशेट्टी यांनी निवडणुक डोळ्यांसमोर ठेवून काही धोरणंही आखली आहेत. कुणालाही नाराज नाही करायचे, कोणा बदल अपशब्द नाही, माणूसकी जपत सर्वाना आपलेसे करतात. सर्वसामान्यांत मिळून मिसळून असणा-या, मितभाषी, गरिबांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणा-या अशा मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून “नागिनीताईं “ची ओळख निर्माण झाली आहे.

दरम्यान, जुळे सोलापूर भागातील लोक नव्या पर्यायाच्या शोधात असल्याचे जाणवू लागले आहे, आणि त्यांच्यापुढे नवा पर्याय म्हणून जाण्याचा निर्णय सौ नागिनीताई प्रविण इरकशेट्टी यांनी घेतला आहे. वयाने,अनुभवाने लहान असूनही कर्तृत्वाने सर्वसामान्य जनतेच्या आकर्षण बनल्या आहेत. आज सर्वसामान्यासह महिला मोठ्या आशा-अपेक्षा लावून नागिनीताईकङे बघत आहेत. नागिनीताई प्रविण इरकशेट्टी ह्या उत्तम संघटन करून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. नागिनीताईंची यांची राजकारणात फार मोठी राजकीय महत्वाकांक्षा नाही, पण राजकारण, समाज कारणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते. नागरिकसह प्रामुख्याने महिलांच्या समस्यांविषयी प्रामाणिक तळमळ आणि त्या समस्या सोडविण्याची जिद्द असली की राजकारणात यशाचा गुलाल उधळता येतो.

राजकारणात पद, खुर्ची यापेक्षा महिलांचा विकास हेच ध्येयधोरण ठेवणे आज काळाची गरज आहे. सौ नागिणीताई प्रविण इरकशेट्टी कोणत्याही उपक्रमात नेहमीच हिरिरीने सहभाग घेऊन, आपले वेगळे नेतृत्व नावारुपाला येऊ लागल्या आहेत. त्यामुळे भविष्यात त्यांचे नेतृत्व विकसित होईल यात शंका नाही. नागिनीताई इरकशेट्टी नेहमी अभिनव उपक्रमातून समाजाचे ॠण फेङण्यासाठी तयार असतात. कारण की मंदिरात देवाला नतमस्तक झाल्यावर मिळणा-या आशीर्वादा पेक्षा अङचणी सापङलेल्या गरजू लोकांचे आशीर्वाद गुणकारी ठरतात असे सौ नागिणीताई प्रविण इरकशेट्टी यांनी सांगितले.

सौ नागिणीताई प्रविण इरकशेट्टी बी कॉम आणि डी एड झाले असून त्या सध्या सुरवसे हायस्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख, माझी उपमहापौर नानासाहेब काळे, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा वरदहस्त त्यांच्यावर आहे. त्यांचे पती प्रवीण प्रकाश इरकशेट्टी हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग प्रदेश संघटक सचिव आहेत त्याचबरोबर सोलापूर युवक जिल्हा अध्यक्ष गुरु रविदास विश्व महापीठ (दिल्ली), ट्रस्टी अध्यक्ष संत रोहिदास समाज सुधारक मंडळ, सदस्य शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर, माजी अध्यक्ष पत्रा तालीम युवक मंडळ, विश्वस्त संत रोहिदास मध्यवर्ती महामंडळ सोलापूर या पदावर सध्या ते सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्या कामाचा आवाका आणि संपर्क फार मोठा आहे.

महानगर पालिका निवडणुकीला काही महिने बाकी असताना सौ नागिणीताई प्रविण इरकशेट्टी बाबत एका राष्ट्रीय पक्षा कडून “उमेदवारी” घोषित होईल असे सूत्राकडून कळते. नागिनीताई इरकशेट्टी यांची उमेदवारी कोणत्या पक्षाकडून जाहिर होते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!