श्री राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने राजस्थानी सत्संग परिवाराच्या वतीनं धार्मिक कार्यक्रम संपन्न

सोलापूर : प्रतिनिधी
श्री राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने श्रीराम नवमी व हनुमान जयंतीचे औचित्य साधून राम चरित्र मानसचा पाचवा अध्याय संगीतमय सुंदर कांड, हनुमान चालीसा किर्तन, श्री गणेशाची आरती, मारुतीचे पूजन करून राजस्थानी सत्संग परिवाराच्या वतीने श्री राजे गणपती मंदिर वसंत विहार येथे कार्यक्रम सादर करण्यात आला.
याप्रसंगी श्री राजे गणपती सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश जगताप यांच्या हस्ते राजस्थानी सत्संग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्रीविठ्ठल दायमा यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्निल पुंगलिया, राजेश पानकर, संजय साळुंखे, राहुल परदेशी, वैभव पाटील, तानाजी पाटील, उमेश रुईकर, बाळकृष्ण बेंडकाळे, मंगेश शिरसागर, विवेक रुपनर, सुहास लोंढे, पवन करणे, मल्लिनाथ चौगुले, आशुतोष माने, महिला मंडळ तर्फे सौ प्रतिभा पुंगलिया सौ स्वाती रुपनर सौ निकिता पानकर सौ सुरेखा जगताप सौ रचना पाटील सौ चित्रा सुरवसे सौ संध्या भोसले सौ अंजना पवार इत्यादी सभासद उपस्थित होते.