बहुजन क्रांती मोर्चा आक्रमक, 9 एप्रिल रोजी विविध मागण्यासाठी मोर्चा आणि जेलभरो आंदोलन..

सोलापूर : प्रतिनिधी
बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, राष्ट्रीय पिच्छडा वर्ग मोर्चा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने 09 एप्रिल 2025 रोजी सायं 4:00 वा अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे व त्या मोर्चाचे समारोप जेलभरो आंदोलनात करण्यात येईल.
09 एप्रिल 2025 रोजी सायं 4:00 वा अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे व त्या मोर्चाचे समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जेलभरो आंदोलनात करण्यात येईल. यामध्ये निवडणुकीमध्ये EVM मशीन रद्द करून बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्यात याव्यात, OBC ची जाती आधारित जनगणना करण्याच्या समर्थनात, RSS आणि BJP च्या माध्यमातून मूलनिवासी बहुजन समाजातील महापुरुषाच्या अपमान करणाऱ्यांच्या विरोधात, महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून काढून बोद्धा कडे सुपूर्द करण्याच्या समर्थनात अनेक विषय यामध्ये समाविष्ट आहेत. या जेलभरो आंदोलनाला संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत.
या पत्रकार परिषदेस अँड योगेश शिदगणे, सैफन शेख, फारुक शेख, अभिषेक शिंदे आदी उपस्थित होते.