मोदीजी देश सुरक्षित हातात आहे हे दाखवून द्या, फक्त निवडणुकीपुरते नारे नकोत : चेतन नरोटे
पहलगाम भ्याड हल्ल्याचा सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध, गृहमंत्री अमित शहा यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा

सोलापूर : प्रतिनिधी
खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली, जम्मू काश्मीरच्या पहलगाम परिसरात निष्पाप पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत संतापजनक, निंदनीय व भ्याड प्रकार आहे. निःशस्त्र, निरपराध नागरिकांना लक्ष्य बनवणे ही मानवतेविरुद्धची कृती असून अशा क्रूरतेचा काँग्रेस भवन सोलापूर समोर जाहीर निषेध करण्यात आला. तसेच काँग्रेस भवन मध्ये या हल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी भ्याड हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा जाहीर निषेध, पाकिस्तान मुर्दाबाद, अमित शहा राजीनामा द्या, भारत माता की जय या सारख्या घोषणा जोरजोरात देण्यात आल्या.
यावेळी चेतन भाऊ नरोटे म्हणाले की, जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे घडलेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत निंदनीय असून, या भीषण हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा गेलेला बळी हृदय पिळवटून टाकणारा आहे. या अमानुष कृत्याचा सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या तीव्र निषेध करत आहोत आणि शहीद झालेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत.
पुढे बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, पहलगाम मध्ये जिथे दोन हजार पर्यटक हजर आहेत तेथील सुरक्षेची जबाबदारी कोणावर होती एकही पोलिस तिथे हजर नव्हता आतंकवादी सैनिकांच्या ड्रेसमध्ये येतात, एकेकाला नाव आणि धर्म विचारून तब्बल अठ्ठावीस लोकांना गोळ्या घालून ठार करतात अनेकांना जखमी करून मोदी सरकारला आव्हान देत आरामात निघून जातात. मोदी सरकारच्या गृहखात्याचा हा अपयश आहे. गेली अकरा वर्षे पंतप्रधान मोदी म्हणतात हा देश सुरक्षित हातात आहे. मग हा देश आत्ता कोणत्या सुरक्षित हातात आहे ? फक्त तोंडाने बोलायचं की आतंकवाद्यांचे कंबरडे मोडले, आतंकवादी संपले, पाकिस्तान घाबरला. पण पुलवामा हल्ल्याला जबाबदार कोण हे अजून ठरवू शकले नाहीत आत्ता या हल्ल्याला जबाबदार कोण? हे तरी लवकर शोधून धर्माच्या नावाने अधर्माचे कृत्ये करणाऱ्या अतिरेक्यां विरोधात जशास तशी कारवाई करावी. हिंदूंच्या नावाने मत घेऊन सत्तेत बसलेले पंतप्रधान मोदीजी आणि गृहमंत्री अमित शहा हिंदूंना संरक्षण देऊ शकत नसतील तर त्यांनी ताबडतोब राजीनामा राजीनामा दिला पाहिजे.
या निषेध आंदोलनात शहर अध्यक्ष चेतन नरोटे, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, माजी महापौर आरिफ शेख, अलकाताई राठोड, म. प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष जुबेर कुरेशी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, VJNT अध्यक्ष युवराज जाधव, तिरुपती परकीपंडला, रुपेश गायकवाड, बसवराज म्हेत्रे, नागनाथ कदम, अंबादास गुत्तीकोंडा, हाजी मैनुद्दीन शेख, हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, करीमुनिसा बागवान, NK क्षीरसागर, हारून शेख, अशोक कलशेट्टी, सिद्धाराम चाकोते, पशुपती माशाळ, एजाज बागवान, लखन गायकवाड, सैफन शेख, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, शिवशंकर अंजनाळकर, गिरिधर थोरात, विवेक इंगळे, विवेक कन्ना,
अनिल जाधव, नागेश बोमड्याल, दाऊद नदाफ, मोहसीन फुलारी, रमेश जाधव, शुभांगी लिंगराज, ज्योती गायकवाड, जितू वाडेकर, भीमराव शिंदे, सायमन गट्टू, नागेश म्हेत्रे, तोसिफ शेख, हाजीमलंग नदाफ, नासिर बंगाली, अनिल वाघमारे, संजय कुऱ्हाडे, मुमताज तांबोळी, अप्पा सलगर, शिवाजी साळुंखे, रफिक रामपूरे, सचिन सुरवसे, अर्चना जाधव, रुकैयाबानू बिराजदार, छाया हिरवटे, मीना गायकवाड, अनवर शेख, शशिकांत जाधव, अस्लम शेख, भारत सलगर, जब्बार शेख, चंद्रकांत नाईक, दीपक मठ, अभिलाष अच्युगटला, मशाक मुल्ला यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.