‘चेक अँड मेट चषक’, खुल्या गटात श्रेयांस शहा विजेता
विविध वयोगटात पृथा, प्रथम, नियान, ज्ञानदा, सान्वी, श्रेयस, साईराज, शशांक विजेते

सोलापूर : प्रतिनिधी
ॲड. सौ. कोमलताई अजय साळुंखे- ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री.बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री गिरिजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय व सोलापुर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजीत केलेल्या ‘चेक अँड मेट चषक’ बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात सोलापूरचा आंतरराष्ट्रीय कॅंडिडेट मास्टर श्रेयांस शहा याने आठ पैकी साडेसात गुण प्राप्त करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तसेच मंगळवेढ्याचा स्वप्निल हदगल व मानांकित विशाल पटवर्धन यांनी अनुक्रमे द्वितीय व तिसरा क्रमांक पटकाविला. ९ वर्षाखालील गटात मुलांमध्ये प्रथम मुदगी, रुद्र झाडे व मुलींमध्ये पृथा ठोंबरे, संस्कृती जाधव यांनी तर ७ वर्षाखालील गटात मुलांमध्ये नियान कंदीकटला, अजिंक्य कांबळे व मुलींमध्ये ज्ञानदा सांगुळे व तनवी बागेवाडी यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविले. ७ व ९ राज्यस्तरीय वर्षाखालील गटातील प्रथम आलेल्या दोन खेळाडुंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. तसेच सर्वोत्तम मुलीमध्ये सान्वी गोरे तर श्रेयस कुदळे, साईराज बोडके, शशांक जमादार यांनी अनुक्रमे १६, १३ व ११ वर्षाखालील गटात अव्वल स्थान पटकाविले.
मातोश्री गिरीजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोलापूर चेस अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्राचार्य डॉ. वासंती पांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी आंतरराष्ट्रीय पंच व संस्थेचे सचिव सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी, श्रीमती प्रा. रेश्मा जाधव, प्रा. रेणुका कोळी, श्रीमती प्रा. वर्षा माने, रूपाली साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांनी केले. स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ पंच उदय वगरे तर त्यांना सहाय्यक म्हणून रोहिणी तुम्मा, प्रशांत पिसे, यश इंगळे, भरत वडीशेरला, मंथन घोडके यांनी यशस्वीरीत्या काम पहिले. तसेच तसेच महाविद्यालयातील सर्व स्टाफसह प्रा. गुरव डी. एफ., प्रा. हेडे एस. एस., प्रा. जाधव आर. बी, प्रा. माने व्ही. एल, प्रा. कोळी आर. पी, ग्रंथपाल साळुंखे आर. एम व लिपिक धसाडे आर. ए. शिंदे अमर यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
विजेत्या खेळाडूंना आकर्षक ‘चेक अँड मेट चषक’, मेडल्स व रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. विजेत्या १०० खेळाडूंना एकूण रु. ४५००० ची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे प्रशांत पिसे, वरिष्ठ राष्ट्रीय पंच वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहिणी तुम्मा, जयश्री कोंडा, यश इंगळे यांनी यशस्वीरीत्या काम पाहिले.
विजेत्या खेळाडूंचे ॲड. सौ. कोमलताई अजय साळुंखे ढोबळे, सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, नामवंत उद्योजक रवींद्र जयवंत, नितीन काटकर, प्रशांत गांगजी, गोपाळ राठोड आदींनी अभिनंदन केले.
*अंतिम निकाल (अनुक्रमे गुण व बोकोल्स गुणांसह):*
*खुला गट:* श्रेयांश शहा – ७.५, स्वप्नील हदगल – ६.५(४४), विशाल पटवर्धन – ६.५(४१), प्रज्वल कोरे – ६.५(३८.५), सागर पवार – ६.५(३५.५), सागर गांधी – ६ (४०.५), पवन राठी – ६(३८.५), विजय पंगुडवाले – ६(३७), शंकर साळुंके – ५.५(३९), प्रसन्न जगदाळे – ५.५(३६), समीर शिंदे – ५.५(३४), चंद्रशेखर बसर्गीकर – ५.५(३४), नंदकुमार सूरु – ५(३५), चंद्रकांत पवार – ५(३४.५), सुनील पवार – ५(३२)
*उत्कृष्ट मुली:* सान्वी गोरे – ६(३४.५), सृष्टी गायकवाड – ६(३३.५), स्वराली हातवळणे – ५(३८), श्रावणी देवनपल्ली – ५(३२.५), सृष्टी मुसळे – ५(३१.५), दीक्षा कुलकर्णी – ५(२८), अनन्या उलभगत – ४.५, ऋतुपर्ण विजागत -४(२८), आदिती इनानी – ४(२८)
*१६ वर्षे:* श्रेयश कुदळे – ६.५, वेदांत मुसळे – ६, हर्ष हळमल्ली – ५.५, अथर्व म्हमाने – ५(३५.५), वेद आगरकर – ५(३२.५), जय तुम्मा – ५(२९), अवधूत विरपे – ५(२८), पलाश उपाध्ये – ५(२५.५), विनायक स्वामी – ४.५(३३), अनय कुलकर्णी – ४.५(३१.५)
*१३ वर्षे: साईराज घोडके – ६, श्रीराम राऊत – ५.५, गणेश बंदीछोडे – ५(३६), सार्थक राऊत – ५(३३.५), सहिष्णू आपटे – ५(३०.५), श्रेयश कंदीकटला – ४.५(३२.५), आयुष जानगवळी – ४.५(२८.५), कार्तिक भागवत – ४(३७.५), अधिराज म्हेत्रे – ४(३५), युवराज गायकवाड – ४(३३), ओम निरंजन – ५.५
*११ वर्षे:* शशांक जमादार – ५(३७), श्रेयश इंगळे – ५(३४), श्लोक चौधरी – ५(२८.५), वेदांत पांडेकर – ४.५(३६), विहान कोंगारी – ४.५(३४), विहान आरकाल – ४.५(३१), प्रतीक हलमल्ली – ४(३४), देवदत्त पटवर्धन – ४(३३.५), आयुष गायकवाड – ४(२९.५), रुद्र बाबर – ४(२७)
*९ वर्षे मुले:* प्रथम मुदगी – ४.५(१६.५), रुद्र झाडे – ४.५(१५), हिमांशू व्हनगावडे – ४(१३.५), नैतिक होटकर – ४(१२.५), मयंक पोतदार – ४(११.५), हर्ष मुसळे- ४(११), पार्थ भांगे – ३(१५.५), आदित्य जानगवळी – ३(१२.५), प्रज्ञांश काबरा – ३(१२), नमन रंगरेज – ३(१२)
*९ वर्षे मुली:* पृथा ठोंबरे – ४, संस्कृती जाधव – ३(९), अन्वी बिटला – ३(८), उत्कर्षा लोखंडे – ३(८), समृद्धी कसबे – २(९), तेजस्विनी कांबळे – २(८), पलक मेसे – २(७), साईशा ठेंगील – २(६), सावी जाजू – २(५), रोशनी हाके – २(५)
*७ वर्षे मुले:* नियान कंदीकटला – ५, अजिंक्य कांबळे – ४(१४.५), लखित काबरा – ४(१२.५), ऋषांक कंदी – ३(१५), अर्जुन सातारकर – ३(१३), अद्विक ठोंबरे – ३(१२.५), ओजस पवार – ३(११), आरुष लामकाने – ३(१०.५), आरुष माने – २.५(१२.५), आयान राठी – २.५(११.५)
*७ वर्षे मुली:* ज्ञानदा सांगुळे – ३, तन्वी बागेवाडी – २(५), ईशा पटवर्धन – २(४), श्रीजा जांभळे – १(५), श्रुतिका मैतराणी- ४
*उत्तेजनार्थ बक्षिसे:* जीवन गड्डम, अनय कुमार, वैष्णवी घंटे, मानवी चौगुले