राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने महामानवला अभिवादन

सोलापूर : प्रतिनिधी
विश्वभूषण बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब तथा भिमराव रामजी आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती दिनानिमित्त विश्वरत्न त्यांच्या भव्य पुतळ्यास राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या जिल्हा शाखा सोलापूरचे तडफदार युवा नेते विजयकुमार भांगे आणि ज्येष्ठ मार्गदर्शक नेते बाळकृष्ण पुतले यांच्या हस्ते पुष्पहार घालून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी आय.टी.आय. सोलापूर जिल्हा गट निदेशक संघटनेचे संयमी नेते शिरीष शेळके हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेचे नेते राजाभाऊ सोनकांबळे, हुसेनबाशा मुजावर,
सटवाजी होटकर, संतोष भंडारे, प्रकाश चव्हाण, अशोक नागरगोजे, भीमराव लोखंडे, शशिकांत भालेराव, नामदेवराव थोरात, आर जे शिंदे, सुनील बोलाबत्तीन, आशुतोष नाटकर, प्रभाकर माने, वैशाली जेधे मॅडम, समीर हूडेवाले, फिरोज मुलाणी, प्रवीण वाघमारे, आरिफ रंगरेज, प्रभाकर होनकळस यांच्यासह राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, शहर, जिल्हा सोलापूर शाखेचे सर्व पदाधिकारी तसेच रासकम संघटनेमधील सर्व खाते निहाय संघटनांचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.