आरोग्यमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसोलापूर

जिया आणि ममता यांच्या फोटोला हार घालून आई वडिलांच्या हस्ते मोदी परिसरात आरोग्यवर्धिनी केंद्राचे केले भूमिपूजन

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर मधील बाबू जगजीवन झोपडपट्टी दूषित पिण्याच्या पाण्यामुळे दोन मुली मृत्यू पावल्या होत्या याच्या विरोधात शिवसेनेच्या राज्यप्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने सोलापूर महानगरपालिकेवर आंदोलन करत त्या मुलींना आर्थिक मदत मिळावी व त्या भागातील 85 गाळा येथील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना त्वरित सुरू व्हावा अशी मागणी केली होती.

या आंदोलनानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या झोपडपट्टी भागात त्या मृत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना पालकमंत्री यांच्या कडून एक लाख व महाराष्ट्र राज्य शासनाकाढून पाच लाख रुपयाची मदत जाहीर केली व दवाखाना त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले होते.

पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर मोदी येथील 85 गाळा आरोग्यवर्धिनीचे उद्घाटन करण्यात आले यामुळे येथील गोरगरीब नागरिकांनां त्या परिसरातच आरोग्य सेवा मिळणार आहे, विविध 85 प्रकारच्या मोफत तपासण्या ह्या दवाखान्यात करता येथील, तसेच रक्तदाब व मधुमेह या आजाराचे औषधही मोफत मिळणार आहेत. जास्तीत जास्त लोकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावे असे आवाहन महानगरपालिका आरोग्य अधिकारी राखी माने यांनी केले.

प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून या भागात सहा महिन्यापूर्वीच हिंदुरुदयसम्राट आपला दवाखाना मंजूर झालेला होता. पण काही मोजक्या लोकांच्या अडमुठेपणा विरोध केल्यामुळे तो दवाखाना सुरू झाला नव्हता तो दवाखाना सुरू असता तर त्या मुलींना लवकर उपचार मिळाला असता व ही दुर्घटना टळली असती, अशी खंत व्यक्त केली.

यावेळी शिवसेना राज्य प्रवक्त्या प्रा.डॉ ज्योतीताई वाघमारे, आरोग्य अधिकारी राखी माने, मोची समाज युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे, अविनाश बेंजर्पे, दीपक पाटील, भीमा मरेडी, गणेश तुपदोळे, सचिन गुंटूनुळ, अविनाश जाधव, स्वप्निल कांबळे, व महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!