बाली मंडेपू यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड, प्रदेशाध्यक्ष पदी मादगी समाजास नेतृत्व करण्यास मिळाली पहिल्यांदा संधी

सोलापूर : प्रतिनिधी (दिल्ली)
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेची राष्ट्रीय बैठक दिल्ली येथे संपन्न झाली. अखिल भारतीय सफाई काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक झाली त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष चरण सिंगजी टांक हे बिनविरोध निवडून आले.
तर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या महाराष्ट प्रदेश अध्यक्ष पदी पहिल्यांदाच मादगी समाजास नेतृत्व करण्यास संधी मादगी समाजाचे बाली मंडेपू यांना मिळाली असून त्यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच मुंबई प्रदेशाध्यक्ष भरतभाई सोलंकी यांची निवड करण्यात आली.
या प्रदेशाध्यक्ष निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांच्या हस्ते बाली मंडेपू यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडी प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जयसिंग कछवा यांनी काम पाहिले.
बाली मंडेपू यांची अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या महाराष्ट प्रदेश अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर सबंध महाराष्ट्रातून आणि सोलापूर शहर जिल्ह्यातून त्यांचांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या निवडी प्रसंगी बोलताना नूतन प्रदेशाध्यक्ष बाली मंडेपू म्हणाले, सफाई कामगारांना, वंचित, गोरगरीब, कष्टकरी कामगारांसाठी अहोरात्र काम करणार असून वेळ पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, सर्वांना न्याय मिळावा या भूमिकेतून काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
बाली मंडेपू यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सफाई मजदूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष नागनाथ गदवलकर, पांडुरंग रातोलू , गोपाल पिडगुलकर, कुमार सांगे, चेन्नई सांगे, बाबा केशपागुल, दशरथ अडाकुल, तुकाराम पेदोलु, आनंद भूमपागा, व्यंकटेश देवनालु यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.