अपहरण व खंडणी प्रकरणी वीट भट्टी मालकाला अटकपूर्व जामीन

सोलापूर : प्रतिनिधी
खासगी सावकारीने कर्ज देऊन जास्त व्याजाची आकारणी करून अपहरण करून दिवसभर डांबून ठेवून हात पाय बांधून मारहाण करून तीन लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी वीट भट्टी चालक सुनील बसप्पा बळी रा.सोलापूर याचा अटकपूर्व जामीन अर्ज मे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.जे.जे.मोहिते सो यांनी मंजूर केला.
यात हकिकत अशी की, दि.१७/३/२५ रोजी सकाळी ११ वा चे सुमारास फिर्यादी ची आई आजारी असल्याने फिर्यादीची मोटारसायकल त्याच्या भावाला देण्यासाठी पुणे येथून सोलापूर येथे आला होता. सोलापुरातील सात रस्ता येथे आल्यानंतर त्यास त्याच्या गावातील मुलगी भेटल्याने ते दोघेही तडवळकर जीम समोरील सिध्देश्वर आईस्क्रीम येथे ज्युस पित बसला असता.त्यावेळी त्याठिकाणी आरोपी हा त्याचे तीन साथीदारासह आला व त्याने फिर्यादीस पैशांची मागणी केली त्यावेळी फिर्यादीने त्यास पूर्ण पैसे दिले असल्याचे सांगितले असता त्याने फिर्यादीस तु मेरे साथ चल असे म्हणून फिर्यादीस घेऊन गेला व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीची मोटारसायकल घेतली होती.आरोपीने फिर्यादिला जबरदस्तीने त्याचे मोटारसायकल बसवून न्ई जिंदगी येथील त्याचे वीट भट्टी येथे घेऊन गेला. तेथे त्याने फिर्यादीस तीन लाखाची मागणी केली व फिर्यादीने पैसे नाहीत असे म्हटले असता फिर्यादीचे दोन्ही हात बांधून जमिनीवर बसवले व पैश्याची मागणी करुन हाताने मारहाण केली. तदनंतर सांयकाळी ७ वाजता फिर्यादीच्या भावाला फोन करून बोलावून घेतले व त्याला देखील पैशाची मागणी केली पैसे नाही दिले तर तुमचे शेत माझे नावावर कर अशी दमदाटी केली. त्यावेळी माझ्या भावाने त्यांना घाबरून आमचे शेताची विक्री करून तुमचे पैसे देतो असे सांगितल्यावर त्यांनी फिर्यादीस रात्री ११ वाजता सोडून दिले. परंतु आरोपींनी फिर्यादीची मोटारसायकल व मोबाईल फोन त्यांनी काढून घेतले. तदनंतर फिर्यादीने आरोपींविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
सदर गुन्हयात अटक होईल ह्या भितीपोटी सुनील बळी याने अँड. संतोष न्हावकर यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
यात आरोपीतर्फे अँड.संतोष न्हावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपी हा वीटभट्टी चालक असल्याचे व फिर्यादी हा वीटभट्टी वर कामगार पुरविणारा दलाल व कामगार असल्याने त्याने आरोपीकडून उचल स्वरूपात घेतलेली रक्कम परत देण्याची नसल्याने फिर्यादीने अपहरणाची व खंडणी मागितल्याची खोटी फिर्याद दाखल केली असल्याचे व फिर्यादीने आरोपीविरुद्ध रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी दिवाणी दावा दाखल केला असल्याचे मे.कोर्टाचे निदर्शनास आणून दिले सदरचा युक्तिवाद ग्राह्य माणून मे.कोर्टाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात आरोपीतर्फे अँड. संतोष न्हावकर, अँड. वैष्णवी न्हावकर,अँड. राहुल रुपनर, अँड. शैलेश पोटफोडे,अँड.मीरा पाटील,अँड.चैतन्य नल्ला यांनी तर सरकार पक्षातर्फे अँड.गुजरे यांनी काम पाहिले.