भारतातील मंदिरे ही आपल्या देशाची ओळख : इंद्रनील बंकापुरे
वीरशैव व्हिजन बसव व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प

सोलापूर : प्रतिनिधी
भारतातील मंदिरे ही आपल्या देशाची ओळख आहे. 15000 हजार वर्षांपूर्वी भारतात मंदिराची निर्मिती झाली. मध्यंतराच्या काळात आपल्या काही मंदिराचे नुकसान करण्यात आले. मंदिरामुळे व्यक्तीच्या शरीरात शक्ती निर्माण होते. त्यामुळे मंदिराचे संरक्षण, संवर्धन आणि संगोपन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे प्रतिपादन मंदिर अभ्यासक इंद्रनील बंकापुरे (कोल्हापूर) यांनी केले.
वीरशैव व्हिजन बसव व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ‘मंदिराच्या देशा’ या विषयावर गुंफताना ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, श्री सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, महावीर बँकेचे चेअरमन दीपक मुनोत, कांचन फाउंडेशनचे अध्यक्ष सुदीप चाकोते, उद्योजक पंडित जळकोटे, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार उपस्थित होते.
यावेळी जगातील सर्वात मोठं हिंदूं मंदिर कंबोडिया या देशात दीड किमी बाय दीड किमी क्षेत्रात, हंपी येथील विठ्ठल मंदिर, गुजरात येथील 11 व्या शतकातील राणी की वाव येथे 12 वर्षे उतखनन केल्यानंतर सात मजली विष्णू मंदिर सापडले, मध्य प्रदेश येथील भीमबेटका येथील अनेक गुहा, कोल्हापूर येथील 1500 वर्षापूर्वीचे महालक्ष्मी मंदिर तेथील चमत्कार सूर्याची किरणे देवीच्या मूर्तीवर पडतात अशा देशातील व परदेशातील 50 मंदिराची माहिती श्री बंकापुरे यांनी दिली.
याप्रसंगी दशरथ वडतिले, बसवराज बिराजदार, अण्णासाहेब कोतली, राजशेखर बारोळे, संतोष मठपती, सोमेश्वर याबाजी, नागेश बडदाळ, शिवानंद सावळगी, राजेश नीला, मनोज पाटील, गौरीशंकर अतनुरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले. विजयकुमार बिराजदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन आभारप्रदर्शन राहुल बिराजदार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समिती सचिव अविनाश हत्तरकी, अमित कलशेट्टी, सोमनाथ चौधरी, बसवराज जमखंडी, शिव कलशेट्टी, सिद्धेश्वर कोरे, संगमेश्वर स्वामी यांनी परिश्रम घेतले.