श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 147 व्या पुण्यतिथीनिमित्त आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने 1500 भक्तांना आमरस (माझा बॉटल) वाटप

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने अक्कलकोट या ठिकाणी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 147 व्या पुण्यतिथी निमित्त अक्कलकोट या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांची पालखीचं आगमन झाल्यानंतर पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आले व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पालखीतील भक्तांना मंदार (महाराज) पुजारी (चोळप्पा महाराजांचे वंशज), मोहित महाराज आनंद तालिकोटी (आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष), सुहास छंचुरे (आस्था सामाजिक संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख), वेदांत तालिकोटी, यांच्या हस्ते एकूण 1500 भक्तांना आमरस (माझा थंड पेय बॉटल) वाटप करण्यात आले.
आस्था सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून अन्न दाना बरोबर अनेक वर्षभर सामाजिक उपक्रम राबवत असते सामाजिक बांधिलकी जोपासत समाजच आपण काही तरी देणे लागतो या उद्देशाने सामाजिक कार्य करण्यात येत असते असे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांनी म्हणाले.
दरम्यान यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी मिरवणूक फत्तेसिंह सिंह चौक मेन रोड समाधी रोड व तसेच सुभाष गल्ली या मार्गी काढण्यात आली. या थंड पेय वाटप करण्यासाठी सिद्धू बेऊर, पिंटू कस्तुरे, योगेश कुंदुर, अनिल काळे, गणेश ठेसे, सुरज छंचुरे, उदय छंचुरे, महेश नागणसुरे, सागर शिरशाड, सागर यलवार, राज स्वामी, या आदींचे सहकार्य लाभले.