महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी उद्योजक सुयश खानापुरे

सोलापूर : प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती जन्मोत्सव महामंडळाची नियोजन बैठक व पदाधिकारी निवड बाळीवेस येथे ट्रस्टी अध्यक्ष प्रवीण दर्गोपाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यंदाच्या वर्षीच्या उत्सव अध्यक्षपदी सोलापूर जिल्ह्यातील कंन्स्ट्रक्शन क्षेत्रातील नामवंत उद्योजक सुयश खानापुरे यांची व उपाध्यक्षपदी शैलेश वाडकर, सिद्धारूढ हिटनळी, समर्थ बिराजदार, अक्षय अंजीखाणे यांची एकमताने निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात मल्लिकार्जुन मंदिरात महाआरती करून व जगद्ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे व छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून बैठकीस सुरुवात करण्यात आली.
यावेळी सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बु, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, प्रशांत बाबर, सागर हिरेहब्बू, निखिल थोबडे, मल्लु पाटील, गणेश साखरे, प्रवीण दर्गोपाटील, अमित रोडगे, कपिल कावळे, शिवराज विभुते, माजी उत्सव अध्यक्ष सिद्धार्थ सालक्की यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर प्रसंगी मागच्या वर्षी मध्यवर्ती महामंडळात सहभागी होऊन जयंती उत्सव यशस्वीपणे पार केल्याबद्दल सर्व मंडळांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या बैठकीमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव साजरी करण्या संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या.
सदर प्रसंगी श्री जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सर्व ट्रस्टी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टी शिवराज झुंजे व आभार प्रदर्शन विरेश उंबरजे यांनी केले.
जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी होऊन महात्मा बसवेश्वर जयंती शांततेत व समाज उपयोगी उपक्रमाने, घरावर भगवे झेंडे लावून साजरी करावी असे आवाहन उत्सव अध्यक्ष उद्योजक सुयश खानापुरे यांनी केले.
पदाधिकारी निवड
अध्यक्ष:- उद्योजक सुयश खानापुरे
उपाध्यक्ष :- शैलेश वाडकर, सिद्धारूढ हिटनळी, समर्थ बिराजदार, अक्षय अंजिरखाने
सचिव पदी:- आकाश करपे
सहसचिव :- अभी कुलकर्णी
कार्याध्यक्ष:- बसवराज कडगंची
सहकार्याध्यक्ष :- शुभम हंचनाळे
कोषाध्यक्ष:- शरद गुमटे
सह कोषाध्यक्ष :- आदित्य म्हमाने
मिरवणूक प्रमुख:- संभाजी आडगुळे ऋषिकेश हिंगमिरे विनायक घंटे
प्रसिद्धीप्रमुख :- रोहित इटगे, प्रणव पोतदार,चंदन पाच्छापुरे, सागर आवजे
पालखी प्रमुख :- सोमनाथ आवजे, मल्लू कलशेट्टी
पूजा प्रमुख:- सोमा
हिरेमठ मल्लिनाथ स्वामी.