शहर मध्य विधानसभा मतदारसंघात गाव वस्ती संपर्क अभियानाला जोरदार प्रतिसाद

सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात 26 व 27 एप्रिल रोजी गाव वस्ती संपर्क अभियानाचे आयोजन करण्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले होते.
या अभियानाअंतर्गत मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्ते, आणीबाणी काळात अटक झालेले कार्यकर्ते, कार सेवक यांच्या गाठी भेटी घेणे, मंदिर परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करणे, शासनाच्या लाभार्थी यांचा सन्मान करणे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करणे, मतदारसंघातील अंगणवाडी, शाळा आरोग्यकेंद्र यांना भेटी देणे असे कार्यक्रम देण्यात आले होते.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली मध्य पूर्व, मध्य मध्य व मध्य पश्चिम या तिन्ही मंडलात अध्यक्ष अक्षय अंजिखाने, नागेश सरगम, नागेश खरात यांनी मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्ते, आणीबाणी मध्ये अटक झालेले व कारसेवक असे माजी आमदार नरसिंग मेंगजी,
माजी महापौर किशोर देशपांडे, रामचंद्र जन्न्, अंबादास बिंगी, माजी विरोधी पक्षनेत्या मोहिनी पत्की, राम तडवळकर, सुधाकर कुलकर्णी, बाशा शेख, मधुकर वडनाल, रुद्रेश बोरामणी, यांच्यासह भारतीय जनता पार्टी सोलापुरात वाढविण्यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट केले अशा सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्यांचा सन्मान केला.
मध्य पूर्व, मध्य व पश्चिम मंडलात प्रभाग निहाय स्वच्छता अभियान, लाभार्थी सन्मान, मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे, माजी महापौर किशोर देशपांडे, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने, नागेश सरगम, नागेश खरात मतदारसंघातील शहर पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
मतदार संघातील तिन्ही मंडलात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बजरंग कुलकर्णी, दत्ता पाटील, प्रशांत पल्ली, विश्वनाथ प्याटी, राजशेखर येमुल, राजाभाऊ माने, मनोज कलशेट्टी, अनिल अंजनालकर, यांनी परिश्रम घेतले.