चौपाड मित्र परिवाराच्या वतीने शिवजन्मोत्सवा निमित्त 7 हजार शिवभक्तांना अल्पोपहार वाटप

सोलापूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा सोलापुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी चौपाड मित्र परिवाराच्या वतीने शिवजन्मोत्सव निमित्त शिवभक्तांना अल्पोपहार वाटप करण्यात येतो. यंदाच्या वर्षीही हा सोहळा चौपाड मित्र परिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला.
चौपाड मित्र परिवाराच्या वतीने शिवजन्मोत्सवा निमित्त शिवभक्तांना अल्पोपहार वाटप करण्याचे हे पाचवे वर्ष आहे. पहिल्या वर्षी 2 हजार दुसऱ्या वर्षी 3 हजार असे करत करत यंदाच्या वर्षी 7 हजार शिवभक्तांना अल्पोपहार वाटप करण्यात आला.
यावेळी चौपाड मित्र परिवारातील पैलवान सतीश कोलारकर, अनिल लोळगे, सुजित गव्हाणे, अभिजीत निर्मल, प्रकाश दळवे पाटील, उज्वल दिक्षित, अजित गव्हाणे, गणेश इंगळे, अभिजीत माने, सोनू गव्हाणे, विकी इंगळे, अप्पू हलकट्टी, सचिन यमदे, स्वामी भागानगरे, यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.