सोलापूरमहाराष्ट्रसामाजिक

दोन महिन्यात महापलिका कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येईल : आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली आज मिटिंग हॉल येथे महानगरपालिकेतील सर्व कामगार संघटना यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रलंबित वारसा प्रकरण, प्रलंबित पेशनर सेवकाची देणी, सातव्या वेतन आयोगाचा हप्ता, सफाई कामगार यांच्या निवासस्थाना साठी जागा, कालबद्ध पदोन्नती लाभ या सह विविध मागणी कामगार संघटना यांनी महापलिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे केली.

यावेळी आयुक्त यांनी वारसदाराच्या प्रलंबित प्रकरणी नियोजनबद्द तयार करून नियुक्ती देण्यात येईल, पेशनर सेवाकाची प्रलंबित देण्याची माहिती संकलित करून नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येईल. या सह कामगार संघटनाच्या प्रलंबित मागण्या लवकरच निकाली काढण्यात येईल अशी माहिती दिली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त रवि पवार, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्यलेखापरीक्षक रुपाली कोळी, मुख्यलेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, उपसंचालक नगर रचना विभाग मनिष भीष्णूरकर, मुख्य सफाई अधिकरी नागनाथ बिराजदार, शकील शेख,

कामगार क्रन्ति युनियन अध्यक्ष अशोक जानराव,अखिल भारतीय सफाई मजदूर संघटना अध्यक्ष बाली मंडेपू, कामगार संघटना संघर्ष समिती अध्यक्ष सायमन गट्टू, कामगार संघटना संघर्ष समिती उपाध्यक्ष बापू सदाफुले, श्रीनिवास मंदोलू, चांगदेव सोनावणे, प्रमुख संघटक श्रीनिवास रामगल, पेशनर संघटनेचे अध्यक्ष माऊली पवार, सचिव एम. आय. बागवान, धर्मवीर संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन हुणजे, महापालिका वाहन चालक संघटटना दिलावार माणियार आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!