सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

भाजपच्या बैठकीत युवकांनी घातला गोंधळ, खासदार धनंजय महाडिक यांच्यासमोर युवकाने मांडले मत

सोलापूर : प्रतिनिधी

लोकसभेत झालेल्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी शनिवारी भाजपने बैठक बोलावली आहे. सकाळी ११ वाजता शांतिसागर मंगल कार्यालयात निरीक्षक खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पराभवामागची कारणे जाणून घेतली. त्यानंतर निरीक्षक खासदार धनंजय महाडिक हे त्याचा अहवाल प्रदेशाला देणार आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव झाला. पराभवाची कारणे शोधण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांची नियुक्ती केली आहे. या बैठकीस जिल्हा, शहर कार्यकारिणीसह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. याप्रसंगी निरीक्षक खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणरोही, शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह भाजपचे आमदारही उपस्थित राहणार आहेत.

लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या पराभवाची कारणमीमांसा करताना भाजपच्या काही शहर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांवर युवक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत आमचे म्हणणे ऐकून घ्या असं म्हणत आरडा ओरड केली. यावेळेस भाजपच्या युवक पदाधिकारी आणि वरिष्ठांमध्ये एकच गोंधळ उडाला. अखेरीस वरिष्ठांनी मध्यस्थी करत सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि बैठकीला सुरुवात केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!