“युसीसी” संस्थात्मक राष्ट्रीय पाककृती स्पर्धेत सोलापूरचा आयुष बिडवे प्रथम, 51 हजारच्या रोख बक्षीसासह “मास्टर शेफ” किताबाचा मानकरी

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

मूळचा सोलापूरचा असलेला आयुष बिडवे हा पुण्यातील युईआय शिक्षण संस्थेत हॉटेल मॅनेजमेंट पदवी शिक्षणाच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.”हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट” क्षेत्रात काम करणाऱ्या या संस्थेने, देशातील ९ विविध शाखांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “युसीसी” राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले होते. यावर्षी या स्पर्धेचा सिझन २ नुकताच लखनऊ येथे संपन्न झाला. या स्पर्धेत देश भरातील शाखामधून १९० स्पर्धक विध्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये आयुष बिडवे यांने प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले.

एकूण तीन फेऱ्यात होणाऱ्या या स्पर्धेत पहिली फेरी ” मिस्ट्री बॉक्स चॅलेंज”, दुसरी फेरी “ड्रेस अ केक ” तर तिसरी फेरी ही” फ्युजन फेरी ” म्हणून संपन्न झाली. या तीन फेऱ्यात सहभागी झालेल्या १९० स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ठ १७ स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. या अंतिम फेरीसाठी स्पर्धकांना तीन तासाच्या अवधीत “स्टार्टर”,”मेन कोर्स”आणि “डेझर्ट “बनवून सादर करायचे होते. या सर्व प्रकारात अव्वल ठरत आयुष बिडवे याने प्रथम क्रमांकाच्या बक्षीसावर आपले नाव कोरले. यामध्ये ₹.५१०००/- च्या रोख रकमेसह, प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, विशेष प्राविण्य प्रमाणपत्र आणि गिप्ट हॅम्पर प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रदान करण्यात आले.दुसऱ्या क्रमांकवरील विजेत्याला ₹.२१०००/- तर तिसऱ्या विजेत्याला ₹. ११०००/- चे रोख बक्षीस देण्यात आले.

“युसीसी “स्पर्धेसाठी केंद्र संचालिका वैशाली चव्हाण, प्राचार्य वसुधा पारखी, शेफ आनंद आणि शेफ रिझवान यांनी तयारी करून घेतल्यानेच आपण प्रथम क्रमांक पटकवला अशी भावना आयुष बिडवे यांनी व्यक्त केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!