जागतिक महिला दिनानिमित्त आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने घेतलेला महिला गुणगौरव पुरस्कार कार्यक्रम कौतुकास्पद : रोहिणी तडवळकर

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर समाज कार्यात अग्रेसर असणारी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने 8 मार्च 2025 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक,क्रीडा व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना गुणगौरव पुरस्कार नगरेश्वर देवस्थान तुळजापूर वेस चौक या ठिकाणी संपन्न झाला.
या पुरस्कारास प्रमुख पाहुण्या म्हणून रोहिणी तडवळकर, (माजी विरोधी पक्ष नेता म.न.पा सोलापूर), अश्विनी चव्हाण (पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ माजी सिनेट सदस्या), वसुंधरा पवार (माजी सहशिक्षिका उमाबाई श्राविका विद्यालय), नयना शहा महेंद्र सोमशेट्टी (अध्यक्ष नगरेश्वर देवस्थान), आनंद तालिकोटी (अध्यक्ष आस्था सामाजिक संस्था), देविदास चेळेकर (संचालक आस्था सामाजिक संस्था), शिवानंद सावळगी (सचिव आस्था सामाजिक संस्था) यांच्या उपस्थितीत सरस्वती माता प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक सामाजिक क्रीडा, क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना महिला गुणगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र,शाल फेटा, भेटवस्तू असे होते.
याप्रसंगी आपल्या भाषणामध्ये रोहिणी तळवळकर मॅडम यांनी म्हणाले की महिलांनी सक्षम व सशक्त व्हावे त्या आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत आजच नव्हे तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून महिला तेथे नेतृत्व करून दाखवले अनेक थोर नेत्या होऊन गेल्या तसेच महिलांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी देखील घ्यावी व आपले आरोग्य निरोगी ठेवावे ती निरोगी असेल तर समाज, देश एक सशक्त नारी बनेल ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेते त्याचप्रमाणे ती समाजामध्ये आपली खारीचा वाटात देखील योगदान देते ती स्वतःचे संरक्षण केले पाहिजे तसेच संरक्षणाचे धडे घेऊन सकारात्मक विचाराने मुली व महिला आपली जीवनाची वाटचाल घेतली पाहिजे तरच आजची महिला सशक्त व सक्षम नारी बनेल आस्था सामाजिक संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे आस्था सामाजिक संस्था अन्नदानाबरोबर येथील देखील ते उपक्रम राबवत असतात ते वाकडण्याजोगे आहे असे म्हणाले*
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास छंचुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन देविदास चेळेकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेदांत तालिकोटी, पिंटू कस्तुरे, सुरज छंचुरे,उदय छंचुरे, यश तालिकोटी, योगिराज आरळीमार, प्रथमेश गावडे, महेश नागणसुरे यांनी परिश्रम घेतले. तसेच विशेष आभार या कार्यक्रमासाठी नगरेश्वर देवस्थान उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे देखील खूप खूप आभार.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील घेण्यात आले तसेच त्यांना भेटवस्तू देण्यात आले तसेच गरिब,गरजू 60 महिलांना साडी देखील वाटप करण्यात आले
*पुरस्कार प्राप्त महिला*
* रेखा पेंबर्ती (मुख्याध्यापिका दमाणी प्रशाला)
* गिता सादूल (मुख्याध्यापिका भु.म.पुल्ली कन्या प्रशाला)
* संरोजना मुलिंटी (मुख्याध्यापिका गांधी नाथा रंगजी प्राथमिक प्रशाला)
* डॉ शिल्पा फडकुले(कन्सल्टिंग रिडॉलॉजिस्ट अँड सोनॉलॉजिस्ट)
* प्रा.प्रतिभा कंगळे (उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय)
* आरती मलजी (शारीरिक शिक्षण संचालक सेवासदन ज्यु. कॉलेज)
* सुवर्णा कटारे (ज्ञानसागर प्राथमिक प्रशाला)
* सुवर्णा कट्टीमनी (सहशिक्षिका चतुराबाई श्राविका प्रा.)
* रामेश्वरी क्षिरसागर (इन न्यूज प्रतिनिधी)
* सपना कांबळे (स्वरांजली चॅनल प्रतिनिधी)
* सुवर्णा कांबळे (प्रा.सोनी कॉलेज)
* अर्चना गव्हाणे (सहशिक्षिका सुशील मराठी प्रशाला)
* अनुराधा थोरात (कराटे प्रशिक्षिका)