महिलादिनी भिमशक्ती संघटनेचे शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे यांचा पुढाकार, 101 कर्तुत्ववान महिलांचा केला सन्मान
सर्वच क्षेत्रात महिला भगिनींचा वरचष्मा : पोलीस निरीक्षक माने

- सोलापूर : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटना शहराच्या वतीने महिलांचा सन्मान व सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे आयोजन भिमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे यांनी केले होते. यावेळी व्यासपीठावर फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने, भीमशक्ती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे, दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक भरतकुमार मोरे, दैनिक सकाळचे उपसंपादक अरविंद मोटे, दैनिक मराठा न्यूज चे संपादक विशाल भांगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजा कदम, शहराध्यक्ष उमेश सुरते, कामगार नेते बापू सदाफुले, महिला जिल्हाध्यक्ष प्रमिला तुपलोंढे, शहराध्यक्ष प्रा. ज्योती गायकवाड, उत्तरचे युवक कॅांग्रेसचे अध्यक्ष महेश लोंढे, मयूर तळभंडारे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी राजा कदम यांनी प्रास्ताविकेत खा. चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखालील भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली. प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांच्या प्रतिमेस पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
आजची स्त्री ही अबला नसून सशक्त आहे. ती कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. स्त्रीने आपले कर्तुत्व सिद्ध करून दाखवले आहे. एकूणच सर्वच क्षेत्रात महिला भगिनींचा वरचष्मा आहे. स्त्रियांच्या प्रगतीवरूनच देशाची प्रगती मोजली जाते. अशा कर्तुत्वान महिलांचा सत्कार केला पाहिजे असे प्रतिपादन फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी केले.
मार्गदर्शन पर भाषणात पत्रकार भरतकुमार मोरे यांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत महिलांच्या हक्काचा समावेश केला आहे. म्हणूनच महिला आज आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहेत असे सांगितले .तर कामगार नेते बापू सदाफुले यांनी महिला आता जागृत झाल्या आहेत. सर्व क्षेत्रात महिलांनी प्रगती केली आहे. अशा महिलांचा सन्मान व्हावा असे सांगितले.
अध्यक्षीय समारोपात सुबोध वाघमोडे यांनी तुमच्या आमच्या जीवनात महिलांचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. अशा महिलांचा सत्कार करणं हे समाजाचं कर्तव्य आहे. महिला पुढे गेल्या तरच घराचा, समाजाचा देशाचा उद्धार होणार आहे याची भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे.
प्रमिला तूपलोंढे यांनीही भाषणात महिला आता कोणत्याही क्षेत्रात मागे राहिली नाही तिला फक्त पुरुषांची साथ हवी आहे. ती अजून झेप घेऊ शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी १०१ महिलांचा यावेळी साडी आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मानाने साऱ्या महिला गहिवरून गेल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश लोंढे तर या कार्यक्रमाचे आयोजन भिम शक्ती शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे यांनी केले. या कार्यक्रमास सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विनोद रणदिवे, अमित कांबळे, सचिन भोसले, अभिजीत डोलारे, विकी लोंढे, कुणाल भोसले, अभिषेक पाटोळे, रतन लोखंडे, विजय रणदिवे, निखिल पवार, राकेश रणदिवे, समर्थ गिराम, गणेश वाघमारे, पृथ्वीराज लोंढे, साहिल जाधव, अमित लोंढे, समर्थ खरात, बंटी खंदारे, सिद्धार्थ पवार यांनी परिश्रम घेतले.