सोलापुर येथील माजी उपविभागीय अभियंता दूर संचार निगम यांना ६ महिन्याची साधी कैद व ३,६०,०००/- ची नुकसान भरपाई देण्याबाबतचा आदेश

सोलापूर : प्रतिनिधी
यात थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी रमेश रामकृष्ण चिकील्ला यांना माजी उपविभागीय अभियंता महादेव मल्लय्या भंडारी व त्यांची पत्नी अनुराधा महादेव भंडारी यांनी त्यांचे घर विक्री करतो म्हणून रक्कम रुपये १,८०,०००/- घेवून खरेदीखत करुन दिले नव्हते.
सदरचे खरेदी खतापोटी घेतलेली रक्कम परत करतो म्हणून महादेव मल्लय्या भंडारी यांच्या खात्यावरील आयसीआयसीआय बँकेचा दिनांक ०१/०२/२०१४ रोजीचा रक्कम रुपये १,८०,०००/- चा स्वतःच्या खात्यावर पुरेशी रक्कम नसताना धनादेश दिला होता. सदरचा धनादेश अनादरीत झाल्याने फिर्यादी रमेश चिकील्ला यांनी मे. कोर्टात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचे कलम १३८ प्रमाणे दिनांक २८ मार्च २०१४ रोजी फिर्याद दाखल केली होती.
सदर फिर्यादमध्ये महादेव भंडारी यांची पत्नी अनुराधा भंडारी हिला आरोपी केल्याने व तिला १० वर्षापेक्षा जास्त कोर्टात यावे लागले त्यामुळे तिला नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये १०,०००/- फिर्यादीने द्यावे या हुकूमासह आरोपी क्र.१ महादेव मल्लय्या भंडारी यांनी रमेश चिकिल्ला यांना रक्कम रुपये ३,६०,०००/- नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश करुन सदर महादेव मलय्या भंडारी यांना त्यांचे वय विचारात घेवून सदर नुकसान भरपाईसह ६ महिन्याची साधी तुरुंगवासाची शिक्षा मे. ज्यु.मॅ. वर्ग-१ सोलापुर विनायक एम. रेडेकर यांनी दिनांक ०७ मार्च २०२५ रोजी सुनावली.
यात फिर्यादीचे वतीने ॲङ डी.एन. भडंगे यांनी काम पाहिले.