
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर जिल्हयाचे विकासासाठी तसेच लाखो जनसामान्य नागरीक, पक्षकार व विशेषतः महिलांच्या न्यासासाठी सोलापूरहून सर्वांना मुंबई येथेच हायकोर्टात जावे लागते. त्यामुळे मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ सोलापूरात होणे हे अत्यंत गरजेचे आहे.
गेल्या दहा वर्षापासून या बाबत पाठपुरावा सुरु असून आपल्या शहर व जिल्हयातील लोक प्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केले असून त्यांच्याकडे राजकीय इच्छाशक्ती नाही. त्यामुळेच अनेक मागण्या जशा सोलापूर विमानतळ, अन्न प्रक्रिया केंद्र, ५० वर्षापुर्वीचे कराड ला गेलेले इंजिनिअरींग कॉलेज, आदि सोलापूरातून गेले आहे. तसेच गेल्या २० ते २५ वर्षात मोठे उद्योगधंदे, कापड गिरण्या एकापाठोपाठ एक बंद पडले असून बेरोजगारी वाढली आहे आणि एकेकाळी ४ नंबरचे वैभवशाली शहर असलेले सोलापूर हे बकाल सोलापूर झाले आहे.
हि परिस्थिती पाहता आपल्या शहर जिल्हयाच्या विकास कामात आता नागरीकांचा सहभाग महत्वाचा आहे. त्या दृष्टीने सर्व क्षेत्रातील नागरीकांनी पुढे आले पाहिजे. या दृष्टीने सोलापूर शहर व जिल्हयातील सर्व क्षेत्रातील मान्यवर नागरीक, विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था, व्यापारी संघटना, वकिल, शिक्षक, डॉक्टर, बिल्डर, इंजिनिअर आदिसह सर्व नागरीक ज्यांना सोलापूर विकासाचा ध्यास आहे व सामाजिक भान आहे अशा सर्वांची एक व्यापक बैठक गुरुवार १० एप्रिल २०२५ रोजी सांय. ५.३० वाजता अस्मिता चॅनल, कर्णिक नगर, सोलापूर येथे मुंबई हायकोर्टाचे फिरते खंडपीठ होण्यासाठी व पुढील दिशा ठरविण्यासाठी आयोजित केलेली आहे.
सदर बैठकीमध्ये बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र चे माजी चेअरमन व विद्यमान सदस्य अॅड. मिलिंद थोबडे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड व्ही एस आळंगे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. एस आर पाटील व सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विजय शिंदे, सह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या आपल्या सर्वांचे हिताच्या बैठकीसाठी आपण सर्व मान्यवर नागरीक बंधु-भगिनी विविध क्षेत्रातील सामाजिक संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सदर बैठकीस आवश्यक उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन अॅड. सुरेश गायकवाड, अॅड. राजन दिक्षीत, अॅड. गोविंद पाटील, उद्योजक युवराज चुंबळकर, अॅड. श्रीमती मंगलाताई चिंचोळकर पत्रकार पांडुरंग सुरवसे, अॅड. खतीब वकील, अॅड. जे जे कुलकर्णी, पत्रकार भरतकुमार मोरे, अॅड. बापुसाहेब देशमुख यांनी केले आहे.