सोलापूरधार्मिकमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

ब्रह्मगर्जना प्रतिष्ठान आयोजित श्री भगवान परशुराम जन्मोत्सव जुळे सोलापूर २०२५-२६ नुतन पदाधिकारी निवड जाहिर

सोलापूर : प्रतिनिधी

ब्रह्मगर्जना प्रतिष्ठान, सोलापूर आयोजित श्री भगवान परशुराम जन्मोत्सव, जुळे सोलापूर २०२५-२६ नुतन पदाधिकारी निवड करण्यात आली. श्री भगवान परशुराम जन्मोत्सव अध्यक्ष सुधीर कुलकर्णी, युवक अध्यक्ष निखिल देशपांडे, महिला अध्यक्षा सायली जोशी, स्वागत अध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष अवदुत काटिकर, उपाध्यक्षा अनिता कुलकर्णी, श्रद्धा अध्यापक, मेकायचा हाने, पौरोहित्य प्रमुख आद्य गुरुजी, जयंतराव तुळजापूरकर, अनिरुद्ध जोशी व विद्यानिधी आचार्य, मिरवणूक प्रमुख चैतन्य पेठे, सचिन वेणेगुरकर व अनघा जहागीरदार, लेझीम प्रमुख राहुल निथिलकर, वैभव पाटील व वैशाली पाटील, स्वानंदी देशपांडे, स्वराली ढोनसळे, प्रसाद प्रमुख अजय कुलकर्णी, जन्मोत्सव बँचेस श्रीराज दडपे, मिरवणूक नियोजन प्रमुख विनायक फलटणकर, अरुण कुलकर्णी व पाठक, महिला नियोजन प्रमुख शर्वरी रानडे, प्रसिद्धी प्रमुख श्रीराज दडपे व अनंत देशपांडे, भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त क्रिकेट सामान्यांचे आयोजन केले आहे.

त्यामध्ये १० पुरुषांची, ४ महिलांची व २ पुरुष पौरोहित्य टीम आहेत. दिनांक १० एप्रिल २५ ते १४ एप्रिल २०२५ दरम्यान सोलापूर येथील भंडारी स्पोर्ट्स क्लब जुळे सोलापूर या मैदानावर होणार आहेत. या स्पेर्धेचे उद्घाटन दिनांक १० एप्रिल २५ रोजी सकाळी ८:०० वाजता मा. अतुलजी कुलकर्णी सो अधीक्षक सोलापूर ग्रामीण पोलीस सोलापूर यांच्या शुभहस्ते व दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ठीक ५:०० वाजता लोकमान्य टिळक यांचे वारसदार रोहित टिळक, पुणे यांच्या शुभहस्ते या क्रिक्रेट स्पेर्धेचे बक्षिस वितरण समारंभास उपस्थित राहणार आहेत.

दिनांक २९ एप्रिल २५ रोजी श्री भगवान परशुराम जन्मोत्सावानिमित्त सकाळी ठीक ८:०० वाजता घनपाठी ब्राह्मणाकडून पावमान यज्ञ व लघुरुद्र अभिषेक यजमान श्री व सौ दैदिप्य वडापुरकर (माजी सभापती परिवहन समिती सो.म.पा. सोलापूर) व ५ दांम्पत्यासह होणार आहे व दुपारी ५:०० ते सायंकाळी ९:०० पर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ५:३० वाजता पारंपारिक पद्धतीने वाजता गाजत श्री भगवान परशुराम महाराज मूर्तिचे भव्य स्वागत व प्रतिष्ठापना होणार आहे व त्यानंतर प्रसाद वाटप होणार आहे तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हाहन श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूरचे प्रमुख प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी केले.

या पत्रकार परिषदेस श्रीकांत कुलकर्णी, निखिल देशपांडे, विक्रम लोणसळे, सुप्रिया जोशी, अँड शर्वरी रानडे, अनिता कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!