आमदार देवेंद्र कोठे यांनी भाजप शहर मध्य विधानसभेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे केले अभिनंदन

सोलापूर : प्रतिनिधी
राज्यात तसेच राज्यातील जिल्ह्यांमध्ये भाजप पक्ष अधिक बळकट करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने सोलापूर शहर भाजप पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आले आहेत. सोलापूर शहरातील भाजप पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांना बळ देण्या साठी पक्ष संघटनेच्या वतीने सदरची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
शहरातील विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये भाजप अधिक बळकट करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून भाजपा शहर मध्य विधानसभेच्या अनुषंगाने या निवडी करण्यात आलेले आहेत. अशी माहिती पक्ष कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना भाजप पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले आहे.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती या पुढील प्रमाणे…
सोलापूर भाजपा शहर मध्य विधानसभेच्या मध्यपूर्व मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने, मध्य-मध्य मंडल अध्यक्ष नागेश सरगम, मध्य पश्चिम मंडल अध्यक्ष नागेश खरात यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
दरम्यान, यापुढील वाटचालीस नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सोलापूर शहर मध्य विधानसभा यांच्याकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.