सोलापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी पुन्हा फुंकले रणशिंग
कृती समिती 17 एप्रिलला जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार, पहिल्याच मिटींगला मिळाला मोठा प्रतिसाद.

सोलापूर : प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सोलापूर येथे व्हावे या मागणीसाठी विशेष बैठकीचे आयोजन गुरुवार 10 एप्रिल 2025 रोजी कर्णिक नगर येथे अस्मिता व्हीजन न्यूज चॅनल च्या कार्यालयात करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते राजु राठी होते सोलापूर जिल्ह्यातून मुंबई उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्याची संख्या दरवर्षी ५००० अधिक आहे. अशा स्थितीत न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून पक्षकारांना न्याय जलद व स्वस्तात मिळवा, यासाठी सर्वसामान्य पक्षकांराचे हित लक्षात घेऊन सोलापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे गरजेचे आहे.
बिहार सारख्या छोट्या राज्यात सहा खंडपीठ आहेत मात्र तुलनेने भौगोलिक दृष्ट्या मोठ्या असणाऱ्या महाराष्ट्रात मात्र केवळ औरंगाबाद व नागपूर या दोन ठिकाणीच खंडपीठ आहे महाराष्ट्र हा लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे राज्य आहे तसेच या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून न्यायालयात दाद मागणार्याची संख्या देखील मोठी आहे. त्या मुळे राज्यातील सोलापूर सह प्रत्येक जिल्ह्यात खंडपीठ व्हावे अशी आता जनतेतून मागणी होत आहे सोलापूर वकील संघाने यापूर्वी 14 फेब्रुवारी 1998 रोजी सर्वप्रथम ही मागणी केली होती त्यानंतर सन 2013 -14 मध्ये 52 दिवसाचे आंदोलन देखील छेडले होते, शिवाय त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा देखील केला आहे नुकतेच भारताचे केंद्रीय कायदामंत्री मेघवाल हे सोलापूर दौऱ्यावर आले असता वकील संघाने तसेच स्थानिक व्यापारी व विविध सामाजिक संस्थांनी त्यांच्याकडे खंडपीठाच्या मागणीसाठी लेखी निवेदन देऊन पाठपुरावा केला होता आता पुन्हा या मागणी साठी जोर धरला जात आहे.
पंढरपूर व सांगेला येथील काही वकीलांनी कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे या मागण्यासाठी नुकतीच पंढरपूर येथून रथयात्रा काढली व त्याला समर्थन दिले होते. ही सोलापूरजिल्हाच्या हिताची दृष्टीने चिंतेची बाब आहे यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. यापुढे सोलापूर जिल्ह्यातील सर्वांनी एकसंध होऊन सोलापूरच्या विकासासाठी लढावे असा सूर देखील या बैठकीतून उमटला. प्रथमता संयोजन समितीचे वतीने ॲड राजन दिक्षित यांनी सर्वांचे स्वागत केले. या बैठकीत ॲड सुरेश गायकवाड ॲड खतीब वकील अभियंता व कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले, नोटरी असोसिएशन चे अध्यक्ष ॲड हेमंत कुमार माळी, ॲड मल्लीनाथ पाटील, ॲड केशव इंगळे, सोलापूर विकास मंच चे सदस्य विजय कुंदन जाधव, जेष्ठ पत्रकार पांडुरंग सुरवसे, जेष्ठ नागरिक संघटनेचे गुरूलिंग कुरनुरकर सामाजिक कार्यकर्ते प्रा.केदारीनाथ सुरवसे आदींनी खंडपीठ का ? कशासाठी ? व्हावे, या मागणीसाठी पाठपुरावा कसा करायचा ? यावर आपली व्यापक भुमिका मांडली. राजु राठी यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ मागणी कृती समिती, सोलापूर जिल्हा. याची घोषणा करून यासाठी कायद्याचे चाकोरीत राहून जन आंदोलन उभे करू असे सांगितले. येत्या १७ एप्रिल ला जिल्हाधिकारी यांना सविस्तर निवेदन देण्याचेही ठरले.
या बैठकीस ॲड असिम बांगी, ॲड सुनिल क्षीरसागर, ॲड अभय बिराजदार, ॲड पी.बी.गायकवाड, ॲड अविनाश कडलासकर, ॲड राहुल गायकवाड, ॲड चॅदपाशा शेख, ॲड एस.आर.रेशमे, ॲड विलास भांबुरे, दत्तात्रय आंबुरे, आनंद पाटील, नागेश शिरूर, यल्लालिंग सोसायटीचे चेअरमन प्रभाकर यादगिरी, संतोष गद्दी आदींसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.