सिद्राम वाघमारे सोलापूर व धाराशीव जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार

सोलापूर : प्रतिनिधी
सिद्राम बसप्पा वाघमारे, वय-३५ वर्षे, रा. १४३, कोनापुरे चाळ, रेल्वे लाईन, सोलापूर सध्या रा. दुर्गामाता मंदीरजवळ, जगजीवनराम झोपडपट्टी, मोदी, सोलापूर याचेविरुध्द सन २०२३ या कालावधीमध्ये, सामान्य नागरीकांची फसवणुक करणे, मोटार सायकल चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द सदर बझार पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र. २५२७/२०२४ दि.०४/१०/२०२४ अन्वये, इसम नामे, सिद्राम बसप्पा वाघमारे, वय-३५ वर्षे, रा. १४३, कोनापुरे चाळ, रेल्वे लाईन, सोलापूर सध्या रा. दुर्गामाता मंदीरजवळ, जगजीवनराम झोपडपट्टी, मोदी, सोलापूर यास सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आलेले आहे.