श्री वटवृक्ष मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे न्यायमुर्ती वृषाली जोशी यांच्या हस्ते पूजन

सोलापूर : प्रतिनिधी
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादप्रमाणे श्री स्वामी समर्थांचा १४७ वा पुण्यतिथी महोत्सव दिनांक १३ एप्रिल ते २६ एप्रिल अखेर होत असून त्यानिमित्त आयोजित धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पूजन मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती वृषाली जोशी- विजय जोशी यांच्या हस्ते व मंदार महाराज पुजारी, मोहीत पुजारी यांच्या मंत्रोच्चारात मोठया भक्तीभावाने करण्यात आले.
याप्रसंगी न्यायमूर्ती वृषाली जोशी, विजय जोशी यांनी मनोभावे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी न्यायमूर्ती वृषाली जोशी विजय जोशी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी बोलताना इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे यंदाचे हे १४७ वे वर्ष आहे. महाराजांच्या १०० व्या पुण्यतिथी पासून धर्मसंकीर्तन महोत्सवाची परंपरा आजही सालाबादप्रमाणे नियमितपणे चालू ठेऊन अखंड स्वामी सेवेचा वसा देवस्थान समिती जोपासत आहे असे मनोगत व्यक्त करून सर्व स्वामी भक्तांनी या धर्मसंकिर्तन महोत्सवात व श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवात सहभागी होऊन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाविकांना केले आहे. तदनंतर दिनांक १३ एप्रिल ते २५ एप्रिल अखेर होणाऱ्या भजनसेवेची सुरुवात भजन सेवा संयोजक यांच्या अधिपत्याखाली व चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत ब्रम्हचैतन्य महिला भजनी मंडळ पंढरपूर यांच्या भजनसेवेने झाली. या भजन सेवेत अक्कलकोट, सोलापूर, वैराग, पंढरपूर, बारामती, मंगळवेढा, सांगोला, लातूर, माळीनगर, पुणे, पानमंगरूळ, इत्यादी ठिकाणाहून येणाऱ्या ५२ भजनी मंडळाची भजनसेवा होणार आहे.
याप्रसंगी अक्कलकोटचे दिवाणी न्यायाधीश मुकुल कल्याणकर, अक्कलकोट न्यायालयाचे स्वप्निल मोरे, धनंजय कलमदाने, अविनाश सुरवसे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, ओंकार पाठक, शिवशरण अचलेर, अमर पाटील, मनोहर देगांवकर, धनराज स्वामी, दर्शन घाटगे, ठेंगळे, माने, मोहन जाधव, महेश मस्कले, श्रीकांत मलवे, अविनाश क्षीरसागर, संजय पाठक, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, सागर गोंडाळ, सिद्धाराम कुंभार, नागनाथ गुंजले, श्रीशैल गवंडी, संजय पवार इत्यादी उपस्थित होते.