चिंतन बैठकीतील प्रकार चिंतनिय, विचारधारा जनाधार संपलेली उरलेली भाजपा आगामी विधानसभेत पूर्णता संपेल : अस्मिता गायकवाड
सोलापूर : प्रतिनिधी
भाजपा विचारधारा व जनाधार संपलेला पक्ष म्हणून पुढे येत आहे, नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरात भाजपचा सुपडा साफ झाला आहे. भाजपा ने नैतिकता गमावली आहे ते जनतेच्या प्रश्नापासून दूर गेलेले आहेत जाती धर्मामध्ये भांडण उभे करून राष्ट्रीय ऐक्य बिघडवित आहेत, सत्तेसाठी वाट्टेल ते करून राजकारणाची पातळी घसरवित आहेत.
त्यामुळेच प्रत्येक जिल्ह्यात भाजपच्या चिंतन बैठकीत सोलापूर सारखाच अनुभव येताना दिसणार आहे. सोलापुरात भाजपच्या चिंतन बैठकीत झालेला गोंधळ हा भाजपचे विसर्जन करणारा आहे आगामी काळात देखील अशाच प्रकारचे चित्र भाजपासह महायुतीत दिसून येईल. जनता भाजपला पूर्णतः कंटाळली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा जनाधार वाढत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे प्रश्न दिन दलिता सह शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय खुबीने मांडताना दिसत आहेत. त्याला प्रचंड समर्थन देखील मिळत आहे.
त्यामुळे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा विधानसभेत अव्वल स्थानी दिसेल. सोलापुर जिल्ह्यात आम्ही किमान पाच जागेवर आग्रही राहणार आहोत. राज्यात महाविकास आघाडी चाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास शिवसेना उपनेते अस्मिता गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.