सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

मराठा समाजाच्या मागणीला विरोध बार्शीत ओमराजे निंबाळकर आणि संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडोमारो आंदोलन

सोलापूर : प्रतिनिधी (बार्शी)

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज पोटतिडकीने आंदोलन करत आहे. परंतु, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय राऊत यांनी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला समाविष्ट करण्याबाबत बेताल वक्तव्ये करून या मागणीला बाधा आणण्याचा प्रयत्न केला आहे. या वक्तव्यांमुळे मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर, सकल मराठा समाज बार्शीच्या वतीने धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि संजय राऊत यांच्या विरोधात ‘जोडो मारो’ आंदोलन करण्यात आले. बार्शीच्या मुख्य चौकात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजाचे लोक सहभागी झाले होते. आंदोलकांनी दोन्ही खासदारांच्या प्रतिमांना जोड्याने मारत आपल्या संतापाचे प्रदर्शन केले.

आंदोलनादरम्यान, पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला होता. परंतु आंदोलन शांततेत पार पडले. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.

मराठा समाजाच्या ओबीसी समावेशनाच्या मागणीला मिळालेल्या या विरोधामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील काळात सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!