धार्मिकमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसोलापूर

देवेंद्र कोठे यांच्या विजयासाठी भाजपा कार्यकर्त्यां कडून श्रीरामाची महाआरती

सोलापूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या विजयासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दाजी पेठ येथील श्रीराम मंदिरात महाआरती केली. देवेंद्र कोठे यांच्या रूपाने भाजपचा शहरातील तिसरा आमदार विधानसभेत जावा अशी प्रार्थना प्रभू श्रीरामाकडे करण्यात आली.

यावेळी भाजपाचे माजी शहर अध्यक्ष रामचंद्र जन्नू म्हणाले, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करून भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचा प्रचार केला आहे. सर्वांच्या प्रयत्नाला यश यावे आणि देवेंद्र कोठे यांचा विजय व्हावा याकरिता प्रभू श्रीरामांकडे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी साकडे घातले.

यावेळी गुरुशांत धुत्तरगावकर म्हणाले, अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विजयासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे, याची खात्री आहे. या विजयाकरिता प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी महाआरती करण्यात आली.

याप्रसंगी भाजपाचे माजी शहर अध्यक्ष रामचंद्र जन्नू, नागनाथ सोमा, रवींद्र नक्का, काशिनाथ गड्डम, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, माजी नगरसेवक मेघनाथ येमुल, मधुकर वडनाल, भाजपा शहर चिटणीस नागेश सरगम, बजरंग कुलकर्णी, महिला मंडल अध्यक्ष लक्ष्मी बदलापुरे, दत्तात्रय पोसा, ओबीसी मोर्चा सरचिटणीस श्रीनिवास जोगी, शिक्षक आघाडीचे दत्ता पाटील, विश्वनाथ बदलापुरे, प्रभाकर गोरंटी, राम गड्डम, संतोष चन्ना, विजय महिंद्रकर, अनिल वंगारी, शावरसिद्ध कोंडा, उमेश अंबाल, प्रकाश गाजुल, ज्ञानेश्वर गवते, अभिषेक चिंता, अंबादास साकीनाल, आदीसह भाजपा प्रभाकर क्रमांक नऊ मधील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!