पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, उध्दव ठाकरे नंतर मराठा योद्धा मनोज जरांगेही सोमवारी सोलापुरात.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील सोलापुरात आल्यानंतर समाज बांधवांना काय संदेश देणार याकडे सोलापुरातील उमेदवारांचे लक्ष.

सोलापूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीमुळे सर्वत्र सर्वपक्षीय राजकारण्यांच्या तोफा सभांमधून धडाडत आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभा एकाच दिवशी म्हणजे सोमवारी (ता. 29 एप्रिल) होणार आहेत. त्यातच आता मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील हेही सोमवारी सोलापूरमध्ये येत आहेत, अशी माहिती मराठा संघटनाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे सोमवारी सोलापूर हा सभांचा हॉटस्पॉट होणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे सोमवारी (ता. 29 एप्रिल) सायंकाळी पाच वाजता मरिआई चौक येथे आगमन होणार आहे. मराठा समाजाच्या वतीने त्यांचे त्या ठिकाणी भव्य असे स्वागत करणार आहोत. स्वागत स्वीकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे पुढे मंगळवेढा, सांगोला, सांगली मार्गे बेळगाव येथे जाणार आहेत. त्या ठिकाणी ते जाहीर सभा घेणार आहेत.