आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला गुणगौरव पुरस्कार जाहीर

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर समाज कार्यात अग्रेसर असणारी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने 8 मार्च 2025 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक,क्रीडा व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना गुणगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहेअशी माहिती अध्यक्ष आनंद तालिकोटी व प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे यांनी दिले. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, शाल, फेटा, रोप असे असणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 8 मार्च वार शनिवार रोजी सायंकाळी 5 वाजता तुळजापूर वेस चौक नगरेश्वर मंदिर या ठिकाणी होणार आहे.
या पुरस्कारास प्रमुख पाहुणे म्हणून रोहिणी तडवळकर (माजी विरोधी पक्ष नेता म.न.पा सोलापूर), अश्विनी चव्हाण (पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ माजी सिनेट सदस्या), वसुंधरा पवार (माजी सहशिक्षिका उमाबाई श्राविका विद्यालय), महेंद्र सोमशेट्टी (अध्यक्ष नगरेश्वर देवस्थान), आनंद तालिकोटी (अध्यक्ष आस्था सामाजिक संस्था), देविदास चेळेकर (संचालक आस्था सामाजिक संस्था), यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित रहावे असे आस्था सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, सचिव शिवानंद सावळगी, चंद्रकांत शहा, सुहास छंचुरे, सिद्धू बेऊर, डॉ महावीर शास्त्री, अनिल जमगे, देविदास चेळेकर, महेश नळे यांनी कळवले आहे.
* हे चौकट आहेत पुरस्काराचे मानकरी*
* रेखा पेंबर्ती. (मुख्याध्यापिका दमाणी प्रशाला)
* गिता सादूल (मुख्याध्यापिका भु.म.पुल्ली कन्या प्रशाला)
* संरोजना मुलिंटी.(मुख्याध्यापिका गांधी नाथा रंगजी प्राथमिक प्रशाला)
* डॉ शिल्पा फडकुले
* प्रा.प्रतिभा कंगळे (उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय)
* आरती मलजी (शारीरिक शिक्षण संचालक सेवासदन ज्यु. कॉलेज)
* सुवर्णा कटारे ( सहशिक्षिका रोशन प्रशाला)
* सुवर्णा कट्टीमनी ( सहशिक्षिका चतुराबाई श्राविका प्रा.)
* रामेश्वरी क्षिरसागर (इन न्यूज प्रतिनिधी)
* सपना कांबळे (दर्पण चॅनल प्रतिनिधी)
* सुवर्णा कांबळे (प्रा.सोनी कॉलेज)
* अर्चना गव्हाणे (सहशिक्षिका सुशील मराठी प्रशाला)
* अनुराधा थोरात ( कराटे प्रशिक्षिका)