सोलापूरक्राईममहाराष्ट्रराजकीयसामाजिक

पोलीस आयुक्तांचे आदेश, शहरातील पोलिसांच्या बदल्या, का आणि कशासाठी केली बदली.?

सोलापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र पोलिस (सुधारणा व पुढे चालू ठेवणे) अधिनियम २०१४ मधील नियम क्रमांक २२ (आय)नुसार गठीत करण्यात आलेल्या पोलिस आयुक्तालय, सोलापूर शहर आस्थापना मंडळाच्या २८ जून २०२४च्या बैठकीत सर्वानुमते झालेल्या निर्णयानुसार प्रशासकीय कारणास्तव तीन सहायक फौजदार, १५ पोलिस हवालदार, ७ पोलिस नाईक व ३५ पोलिस शिपायांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

तर २० जणांना आहे त्याच ठिकाणी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, बदली झालेल्या अंमलदारांना संबंधित पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यमुक्त करावे. तसेच बदली झालेल्या अमंलदारांनी बदलीच्या ठिकाणी हजर राहून त्याचा अहवाल कार्यालयास सादर करावा, असेही आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे.

बदली झालेले अंमलदार व नवीन पोलिस ठाणे

१) सहायक फौजदार : गणपती कोले, कुमार सरवदे व वसंत राठोड (सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ), पांडुरंग शिवा वाकडे (फौजदार चावडी), झाकीरहुसेन पटेल (विशेष शाखा), प्रशांत बेंद्रे (मोटार परिवहन विभाग).

२) पोलिस हवालदार : अंबादास शिवशरण, सिराज शेख, रविंद्र कुंभार, जावेद नाईकवाडी, राहुल गायकवाड, आप्पासाहेब कोळी, विलास मालतुमकर, किशोर पवार, बसवराज अडगल, अर्जुन गायकवाड (१ वर्ष मुदतवाढ), सुनील राठोड (फौजदार चावडी), सुभाष चव्हाण (विजापूर नाका), सुनील चव्हाण (एमआयडीसी), चंद्रकांत कोकरे (शहर वाहतूक शाखा दक्षिण), जितेंद्र भोसले (एमआयडीसी), समीर मुजावर (एमआयडीसी), दयानंद वाडीकर (जोडभावी पेठ), गजानन जाधव (फौजदार चावडी), नंदराम गायकवाड (गुन्हे शाखा), स्वामीदास काळे (फौजदार चावडी), आनंद सिरसाट (पोलिस मुख्यालय), संध्या गायकवाड (पोलिस मुख्यालय), कृष्णाबाई चव्हाण (पोलिस मुख्यालय), राजशेखर माळी, विक्रम सलगर (मोटार परिवहन विभाग).

३) पोलिस नाईक : स्मिता म्हमाणे, बसवराज अडगल, अर्जुन गायकवाड, (१ वर्ष मुदतवाढ), राजेश माने (पोलिस मुख्यालय), सुजाता यादवाड (महिला सुरक्षा विशेष कक्ष), हसीनाबानो मुल्ला (विशेष शाखा), मंजुळा वाघमोडे (एमआयडीसी), रोहन ढावरे (जोडभावी पेठ), वसीम शेख (पोलिस मुख्यालय), रेश्माबेगम मड्डी (मोटार परिवहन विभाग).

४) पोलिस शिपाई : वैभव बोराडे, नवनाथ गायकवाड, श्रीशैल चडचण, सचिन खटके, फिरोज शेख (एक वर्ष मुदतवाढ), अमोल हुलमजगे (आयुधिक शाखा), पवन ननवरे (विशेष शाखा), दुर्योधन देशमुख (जेलरोड), फिरोज शेख (नियंत्रण कक्ष, वायरलेस ऑपरेटर), बिभिशन जाधव (फौजदार चावडी), अमित कांबळे (जोडभावी पेठ), मल्लू बिराजदार (फौजदार चावडी), किरण जाधव (जोडभावी पेठ), दत्ता जाधव (शहर वाहतूक शाखा दक्षिण), विठ्ठल काळजे (जोडभावी पेठ), रविंद्र सरवदे (एमआयडीसी), अविनाश डिगोळे (एमआयडीसी), हनुमंत गायकवाड (पोलिस मुख्यालय), महेश आरळे (जेलरोड), कविता डांगे (महिला सुरक्षा विशेष कक्ष), माधुरी नडगीरे (नियंत्रण कक्ष, पोलिस उपायुक्त मुख्यालय कार्यालय), अश्विनी लोकरे (अर्ज शाखा), शोभा ग्राम (पोलिस मुख्यालय), प्रतिभाराणी गायकवाड (कन्व्हिक्शन सेल), सरिता भांगे (विशेष शाखा), सचिन पवार, शशिकांत पाटू, दिगंबर जाधव, सुरेश कोळी, तात्यासाहेब जाधवर (मोटार परिवहन विभाग), प्रविण बनसोडे (पोलिस मुख्यालय), सतीश पाटील (फौजदार चावडी), सकलेन मुकादम (एमआयडी), शिवबाळ्या मलवे (शहर वाहतूक शाखा दक्षिण), राजकुमार रोकडे (पोलिस मुख्यालय), महेंद्र फुलारी (सलगर वस्ती), नंदकुमार विटकर (फौजदार चावडी), प्रिया ढेपे (अनैतिक मानवी प्रतिबंधक शाखा), सविता पाटील (एमआयडीसी), जनाबाई भोये (महिला सुरक्षा विशेष कक्ष).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!