सोलापूरक्राईममहाराष्ट्र

माढा, कुडूवाडी, दहिसर, बोरिवली, मुंबई, परिसरातुन गाडया चोरी केल्याची चोरट्यांनी दिली कबुली

माढा पोलीस ठाणेची कामगिरी, चोरीच्या गुन्हयातील चोरीस गेलेल्या ८ लाख ६५ हजार किमतीच्या ११ मोटार सायकली केल्या जप्त

सोलापूर : प्रतिनिधी

सुनिल दत्तात्रय बोकेफोडे रा. उपळाई रोड पाटील कॉनली बार्शी, ता. बार्शी जि. सोलापूर यांनी माढा बस स्टॅन्ड परिसरातुन अज्ञात इसमाने त्यांचे मालकीची मोटारसायकल एक हिरो कंपनीची डेस्टनी प्राईम पर्ल सिलव्हर व्हाईट रंगाची मोटार सायकल तिचा गु र.नं एम.एच १३ ई जे ६९३१ ही ६५,०००/-रू रक्कमेची कोणीतीर अज्ञात चोरूटयाने चोरून नेली म्हणून माढा पोलीस ठाणेस दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणेस गु.र.नं ६८/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे ०१ मे २०२४ रोजी दाखल झाला आहे. सदर गुन्हयाचा तपास माढा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी नेताजी बंडगर यांचे मार्गदर्शनाखाली माढा शहर बीट येथे कार्यरत असलेले पोहेका/प्रणय शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता.

त्याप्रमाणे माढा पोलीस ठाणेस कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार गुन्हयातील अज्ञात आरोपी यांचे मागावर असताना त्याना गुन्हयातील चोरी केलेली मोटार सायकल उपळाई खु येथील संशयीत इसमाने चोरी केली असल्याचे गोपनीय रित्या माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे संशयीत आरोपी याच्या ठाव ठिकाणाची माहिती व गोपनीय रित्या काडून त्यास गुन्याचे तपास कामी उपळाई खु येथून ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता. त्यांने गुन्हयातील चोरी केलेले मोटारसायकल चोरी केल्याचे कबुली दिली आहे.

सदर गुन्हयातील संशयीत आरोपीस यास गुहयात अटक करून न्यायालया समक्ष हजर करून त्याची वेळोवेळी पोलीस कस्टडी घेवून तपास केला असता त्यांने माढा पोलीस ठाणे, कुडूवाडी पोलीस ठाणे, दहिसर पोलीस ठाणे, बोरिवली पोलीस ठाणे मुंबई, परिसरातुन गाडया चोरी केल्याचे कबुली दिली. सदर परिसरातुन चोरी केलेल्या एकुण ११ मोटारसायकली एकुण किंमत ८,६५,०००/-रू किंमतीच्या सदर गुन्हयात जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोहेकों प्रणय शिंदे हे करित आहेत.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक प्रतिम यावलकर, व उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी विभाग बार्शी, जालिंधर नलकुल सोयांचे मार्गदर्शनाखाली व माढा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी नेताती बंडगर यांचे नेतृत्वाखाली माढा पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी पोसई/जगताप, ग्रेपोसई/हांडे, खंडागळे सपोफौ/पी. एस. मांजरे, पोहेकॉ/१८१६पी.बी. शिंदे, पोहेकॉ/१६६८ निचळ, पोना /११८० बनसोडे, पोकॉ/२३०एम. डी. शिंदे, पोकॉ/११३८एस. एस. घोळवे, व सायबर पोलीस ठाणे कडील पोकों / ११८२ जाधव व चालक पोकॉ/शेळके, पोकों/काशिद, पोकों/मस्के यांनी कामगिरी बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!