सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
अमित शहा यांच्या वक्तव्या विरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीनं २३ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा

सोलापूर : प्रतिनिधी
राज्यसभेत अमित शहा यांनी त्यांच्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी, अमित शहांनी माफी मागावी, त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकावी या मागणी साठी खासदार प्रणिती शिंदे व ज्येष्ठ नेतेमंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार २३ डिसेंबर २०२४ सकाळी ८:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावर “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा” आयोजित केला आहे.