संविधान बदलणार असा नॅरेटीव्ह काँग्रेसने पसरवला असा आरोप ॲड वाल्मीक निकाळजे यांनी केला

सोलापूर : प्रतिनिधी
काँग्रेसने देशातील दलितांमध्ये भारतीय संविधान बदलणार असा नॅरेटीव्ह पसरून सत्ता काबीज करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असा आरोप संविधान जागर यात्रेचे प्रमुख भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड वाल्मीक निकाळजे यांनी पत्रकार परिषदेत केला.
विविध आंबेडकरी संघटनांनी एकत्र येऊन राज्यात संविधान जागर समिती महाराष्ट्र यांच्या वतीने संविधान जागर यात्रा 9 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 24 दरम्यान सत्याग्रह भूमी महाड ते चैत्यभूमी अशी आयोजित करण्यात आली आहे. संविधान जागर यात्रेच्या अनुषंगाने शनिवारी जागर यात्रा सोलापूर दौऱ्यावर आली शनिवारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रमुख नेत्यांची श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आल होत त्यावेळी निकाळजे हे बोलत होते.
मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने देशभरात भाजपा भारतीय संविधान बदलणार असा नॅरेटीव्ह निर्माण करून केंद्रातील सत्ता काबीज करण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्याकडून झाला. इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा केंद्रात काँग्रेस पक्षाची सत्ता आली, त्या त्यावेळी काँग्रेसने संविधानात बदल केला आहे. असा आरोप भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड वाल्मीक निकाळजे पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान हि यात्रा सायंकाळी न्यू बुधवार पेठेतील बॉबी चौक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल आहे. अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सांगीतले. या पत्रकार परिषदेस बीड येथील जय भीम आर्मीचे नितीन मोरे, मुंबईच्या योजना ठोकळे, मुंबईच्या स्नेहा भालेराव, सोलापूरचे राजा माने, अजित गायकवाड, माजी नगरसेवक प्रा नारायण बनसोडे आदीसह भाजपाच्या अनुसुचित जातीमोर्चाचे प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित होते.